कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):- दि. 23 जुलै 2023 रोजी मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा मतदारसंघातील कारंजा व मानोरा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करणे बाबत,मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय ना.अनिलजी पाटील आणि पालकमंत्री मा.संजयजी राठोड यांच्याकडे पत्र देवुन त्यांचे लक्ष या बाबींकडे वेधुन घेतले असता, संबंधित मंत्री व पालकमंत्री यांनी वाशिम जिल्हाधिकारी यांना उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत.
आमदार राजेंद्र पाटणी यांनी सांगितले की, "माझ्या मतदारसंघातील कारंजा व मानोरा तालुक्यातील ग्रामिण भागात,मागील पाच दिवसापासून मुसळधार,ढगफुटीसदृष्य पाऊस होऊन मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे.त्यामुळे कारंजा व मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.शेतातील विहिरी खचल्या असून पशुधनाचेही नुकसान झाल्याचे समजते.तसेच अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने घरांची पडझड झाली आहे.तरी मानोरा आणि कारंजा तालुक्यातील सदर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणेबाबत संबंधित यंत्रणेला तात्काळ निर्देश देण्यात यावे. आमदार राजेंद्रजी पाटणी यांनी उपरोक्त केलेल्या मागणी
बाबत मंत्री,मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मा. ना. अनिल पाटील व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय ना. संजय राठोड यांनी उचित कार्यवाहीचे निर्देश वाशिम जिल्हाधिकारी यांना दिले असल्याचे वृत्त आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्विय सहाय्यक संजय भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेकडे दिल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.