अकोला:- जिल्हा अकोला पोलिस घटकातील पोलिस स्टेशन खदान अंतर्गत अपराध क्रमांक ५२१ / २४ , कलम ४५२ , ३९२ , ३९७ , ३४ भादंविअंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन , फिर्यादी नामे नवल केडीया , रा . आळशी प्लाॅट , अकोला , जिल्हा अकोला ह्यांची तोंडी तक्रारीवरुन दिनांक २७ / ०६ / २०२४ ला रात्रो अंदाजे २१ : ०० वाजता त्यांचे घरात ०४ अज्ञात ईसम घुसुन , फिर्यादी ह्यांना चाकुचा व बंदुकीचा धाक दाखवुन त्यांचे घरातुन जबरी चोरी करुन नगदी व सोन्या - चांदीचा ऐवज असा एकुण रु . ५७ , ००० /- हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला . तपासामध्ये फिर्यादीने अज्ञात ईसमांच्या दिलेल्या वर्णनाप्रमाणे दोन स्केच तयार करण्यात आलेले असुन , ते सोबत जोडण्यात आलेले आहे . करीता जनतेला आवाहन करण्यात येते की नमुद स्केचमधील वर्णनासारख्या अज्ञात ईसम आपल्या आजु - बाजुला अथवा परीसरात आढळुन आल्यास , नमुद केलल्या पत्यावर माहीती देण्यात यावी . व सदरची नोट सार्वजनीक माध्यमांवर जास्तीत जास्त प्रसारीत करण्यात यावी . नमुद ईसमांची माहीती देणा-या माहीतगाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येऊन , त्यांना योग्य ते बक्षिस देण्यात येईल .
माहीतीस पत्ता :-
पोलिस स्टेशन खदान , जिल्हा अकोला .
०१.) श्री . गजानन धंदर , पोलिस निरीक्षक , पोलिस स्टेशन खदान , मो . क्रमांक ९८२३२३६०३४
०२.) श्री . निलेश करंदीकर , सहा . पोलिस निरीक्षक , पोलिस स्टेशन खदान , मो . क्रमांक ८९९९१३२६२६ .