अमरावती : मोर्शी तालुक्याच्या लिहीदा या खेड्या गावात शिक्षणाची सुविधा नसतांना, गावालगतच्या शिरखेड येथे श्री विवेकानंद विद्यामंदिर शिरखेड ता. मोर्शी जि.अमरावती येथे शाळेकरीता जाऊन, इयत्ता दहावीच्या शालांत परिक्षेत ८३ % गुण घेऊन कु.वैष्णवी रविन्द्र मुलनकर ही यशस्वी ठरली आहे. कु.वैष्णवी रविन्द्र मुलनकर ही अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी असून,घरात अडीअडचणीला सामोरे जात तीने अभ्यास केला.मेरीट मिळविण्याचे तिचे स्वप्न पूर्ण न झाल्याने ती काहीशी हताश झाली होती.परंतु परिस्थिती विपरीत असतांही तीने मिळविलेले यश निश्चितच चांगले आहे. भविष्यात तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. आता तर सुरुवात आहे. इयत्ता बारावी परीक्षा पुढे आहे.अशा शुभेच्छा तीच्या यशाबद्दल तिचे मामा पत्रकार संजय कडोळे यांनी तीला दिल्या आहेत. तीने आपल्या यशाचे श्रेय आई सौ. रुपाली,वडिल रविन्द्र,आज्जी, आजोबा आणि गुरुजन मुख्याध्यापकांना दिले आहे.