कारंजा : काही दिवसांपूर्वी कारंजा पंचायत समितीचे सभापती म्हणून नियुक्त झालेल्या मनभा येथील रहिवाशी असलेले सभापती प्रदिप यशवंत देशमुख तसेच सरपंचा श्रीमती उषाताई देशमुख यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव शितल देशमुख तसेच ग्राम पंचायत मनभा सदस्य विजय ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अमरावती येथील सुप्रसिद्ध डॉ. सुभाष रत्नपारखी, प्रमुख उपस्थितीमध्ये संत नागाबाबा संस्थानचे अध्यक्ष व्यंकटराव कावरे, सचिव नंदकिशोर कव्हळकर, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे सांस्कृतिक विभाग तालुका प्रमुख संजय कडोळे, माजी सैनिक शिवाजीराव गायकवाड, उमेश अनासाने, सतिश रंगे, गोपी देशमुख यांच्या हस्ते स्थानिक नंदकिशोर मित्र मंडळ, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद कारंजा आणि संत नागाबाबा संस्थान मनभा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला निवडक गावकरी मंडळी सुद्धा उपस्थित होते.