तालुक्यातील मुख्य महामार्गावर असलेल्या गांगलवाडी येथील तलावात इसमाने उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना दिनांक:-५/४/२०२४ ला अंदाजे सकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान घडली.
पुरुषोत्तम सूर्यवंशी वय वर्ष अंदाजे ५५ गांगलवाडी येथील रहिवाशी आहे.
सविस्तर वृत्तांत असे आहे की, मृतक पुरूषोत्तम चा केस कर्तनालयाचा व्यवसाय होता. सकाळी दररोज ८ ते ९ वाजता केस कर्तनालयाचे दुकान सुरू करायला जायचा माञ सकाळी ५ ते ६ वाजता घरून केस कर्तनालय दुकानाकडे गेला आणि केस कर्तनालय दुकानाचे शटर थोडे उघडून सायकलने तलावाकडे गेला.सायकल आणि चप्पल तलावाजवळ ठेवून तलावात उडी घेतली. ही माहिती कुटुंबीयांना माहिती होताच घटनेची माहिती पोलिस विभागाला देण्यात आली. एका पाणबुड्याच्या साह्याने तलावातील पाण्यात पुरुषोत्तम चा शोध घेतला असता दूपारी १ वाजताच्या दरम्यान पुरुषोत्तमचा शोध लागला.तलावातील पाण्याच्या बाहेर पुरुषोत्तमचा मृतदेह बाहेर काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले. मृतक पुरुषोत्तम च्या पच्छात्य पत्नी, मुले सुन नातवंडं असा आप्त परीवार आहे.