स्वातंत्र्य काळापूर्वी, लोकमान्य टिळकांनी, श्री गणेशोत्सव, शिवजंयती सार्वजनिक रित्या साजरी करण्यामागे, समाजाला सण उत्सवाद्वारे एकत्रीत जोडून त्यामधून शांती, सलोखा, सदभावनेचा संदेश देण्याचा आपल्या राष्ट्रप्रती, देशाप्रती स्वाभिमान बाळगून सर्वधर्म समभाव साधीत राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा होता. लोकमान्यानी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सवाचा पायंडा आजतागायत सुरु आहे आणि पुढेसुद्धा सुरुच राहणार आहे. गेल्या. त्यामुळे आपल्या शासन - प्रशासनाने सुद्धा सार्वजनिक उत्सवाला अनुमती दिलेली आहे. संपूर्ण जगामध्ये आपला एकमेव भारत असा आहे की, आपल्या देशाला सप्तरंगी धनुष्या प्रमाणे विविध धर्म, जाती, भाषा, वेशभुषा, सण त्यौहार, ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा आहेत. त्यामुळे अशा सण आणि महोत्सव, यात्रा यामधून, रोजच्या थकाथकीच्या, व्यस्त अशा रहाटगाडग्या मधून विरंगुळा मिळतो. अशा सण उत्सवा मधून, विविध सामाजिक उपक्रम राबवीले जातात. सांस्कृतिक लोककलेच्या कार्यक्रमामधून मनोरंजनही होते . आणि आपला थकवा जावून उत्साह संचारतो. . . गेल्या जवळ जवळ दोन अडीच वर्ष पर्यंत कोव्हिड 19 कोरोना महामारीमुळे, संपूर्ण जगावर, देशावर, राष्ट्रावर, जिल्हयावर, गावावर आणि अनेकांच्या कुटुंबावर "न भुतो न भविष्यती" अशा प्रकारचे संकट ओढवले होते त्यामुळे शासनाने, जमावबंदी - संचारबंदी लागू केली. सण, उत्सव, यात्रा, बाजार, शाळा महाविद्यालये, प्रवास, रेल्वे, एसटी सर्व क्षेत्रात मनाई करण्यात आली. अख्खी कुटुंबच्या कुटूंब स्वतःच्या घरात नजरकैदेत असल्या प्रमाणे बंदिस्त झालीत. कित्येकांच्या नोकऱ्या, व्यवसाय, रोजगार बुडाले होते. शेकडो कुटूंबाची उपासमार झाली. परंतु नागरिकांच्या सहकार्याने अखेर शासनाने कोरोना महामारीवर विजय मिळवीला आणि दोन अडीच वर्षानंतर जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत सुरु झाले. त्यामुळे शासनाने सण, उत्सव, यात्रा यांना परवानगी दिली आणि समाजव्यवस्थेत नवचैतन्य आले आहे. त्यामुळे कोव्हीड 19 नंतर यंदाचा श्रीगणेशोत्सव खुल्या दिलाने मोकळा श्वास घेऊन धुमधडाक्यात साजरा होणार हे निश्चित आहे. श्रावण महिना आला म्हणजे आम्हा भारतियांना गणरायाच्या आगमनाची चाहूल लागते . आणि गणराया सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे शांती, सलोखा, भाईचारा, सर्वधर्म समभाव, राष्ट्रिय एकात्मता साधण्याचे कार्यक्रम सुरु होतात . त्यामुळे शासनाने सुद्धा खुल्या दिलाने आता गणरायाच्या उत्सवाला परवानगी द्यावी आणि समाज व्यवस्थेने सुद्धा एक दुसऱ्याचा आदर सन्मान राखीत आपला धार्मिक उत्सव कुणाला त्रास होणार नाही . आणि आपल्या उत्सवातून शांती, सलोखा, सद्भावना, सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जाईल . व मानवसेवा परमो धर्मः चा संदेश देत अखंड मानवता निर्माण होईल अशा प्रकारे साजरा करावा करीता माझ्या लेखणी द्वारे माझा समाज प्रबोधनाचा हा प्रपंच !
लेखक : संजय कडोळे [समाज प्रबोधनकार] महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, गोंधळीनगर, कारंजा [लाड] जि.वाशिम. मो.9075635338.
आपल्या प्रतिक्रिया द्या....