संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य विभागात महाराष्ट्र शासनाने यशस्वी ग्रुप या कंपनीला ठेकेदार पद्धतीने डाटा एंट्री ऑपरेटर भरले असुन यशस्वी ग्रुपच्या मनमानी कारभारा विरोधात महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागात काम करणारे सर्व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी संप पुकारला असून ब्रम्हपुरी तालुका आरोग्य अधिकारी मा. डॉ. वी. वी.दुधपाचारे यांना दिनांक :-३०/१०/२०२३ ला निवेदन देण्यात आले आहे.
सविस्तर असे कि महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागास मनुष्यबळ कमी डाटा एन्ट्री ऑपरेटर चे कामे करण्यासाठी पुणे येथिल यशस्वी ग्रुप या कंपनीला करार दिलेला असुन यशस्वी ग्रुप या कंपनी मार्फत आरोग्य विभागात डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षनार्थी म्हणुन भरती केले आहे यशस्वी ग्रुप मार्फत काम करणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना महिन्याला फक्त 9000 हजार प्रमाणे मानधन अदा करण्यात येत असुन यशस्वी ग्रुप या कंपनीने राजरोस पणे आपल्या मनमरजी प्रमाणे कारभार करण्याचे सत्र सुरु केले दिसुन येत आहे.यशस्वी ग्रुप कंपनी मार्फत ज्या ठिकाणी डाटा एन्ट्री ऑपरेटर काम करीत आहे त्यांना यशस्वी ग्रुप कंपनी आपल्या मनमानी कारभारने जेव्हा पटेल तेव्हा डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना काढत आहे.अश्या मनमानी कारभाराला कंटाळून ब्रम्हपुरी तालुक्यातील आरोग्य विभागात काम करणारे संपूर्ण डाटा एंट्री ऑपरेटर यांनी संप पुकारला असुन महाराष्ट्र शासनाने यशस्वी ग्रुप या कंपनीला करार देतांना मनमानी कारभार करण्यासाठी त्यांना करार दिला आहे का? शासनाने यशस्वी ग्रुप कंपनीला करार देतांना डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना मानधन फक्त 9000 प्रमाणे देण्यास सांगितले आहे का यशस्वी ग्रुपचा दिवसेंदिवस मनमानी कारभार वाढत असतांना मात्र शासन या कडे दुर्लक्ष का करत आहे.असे अनेक प्रश्न ज्यांनी कोविड काळात आपल्या जिवाची व परिवाराची पर्वा न करता डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी काम केले असतांना सुद्धा यशस्वी ग्रुप कंपनी कडून संपूर्ण महाराष्ट्रातील डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्यावर अन्याय करण्यात येत असून शासनाने याबाबत दाखल घ्यावी व शासनाने मनमानी कारभार करणाऱ्या यशस्वी ग्रुप कडून करार काढुन घेऊन महाराष्ट्रातील संपूर्ण डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सामावून घ्यावे किंवा शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली जात आहे.अश्या या यशस्वी ग्रुप च्या मनमानी कारभारा विषयी संपूर्ण जिल्हात मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद समोर मोर्च्यात करण्यात येणार आहे. असे आवाहन ब्रम्हपुरी तालुक्यातील आरोग्य विभागात काम करीत असलेले डाटा एंट्री ऑपरेटर यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.