वरोरा :- वरोरा तालुक्यातील 18 कि. मी. अंतरावर असलेल्या शेगाव जवळील दादापूर येथील रहिवाशी असलेले किरण प्रवीण नन्नावरे ( गर्भवती महिला ), प्रियेष प्रवीण नन्नावरे यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये पाल दिसून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
वरोरा तहसील मधील दादापुर येथील रहिवाशी प्रवीण मोरेश्वर नन्नावरे यांची पत्नी किरण प्रवीण नन्नावरे ही गर्भवती असून तिला दोन वर्षाचा प्रियेश नावाचा मुलगा आहे. या दोघांनाही अंगणवाडी केंद्र दादापुर पोषण आहार मधून मिळणाऱ्या खिचडी ( उसळ ) मध्ये दि. 24 जून रोजी आठसे पंचाहत्तर ग्राम पुडा खोलून खिचडी ( उसळ ) करण्यासाठी गेले असता या उसळीच्या पुड्यामध्ये कित्येक दिवसापासून असलेली काळी कुट्ट पाल आढळून आल्याने याची माहिती तिने आपल्या पती प्रवीणला सांगितले मात्र दादापूर येथील सहाय्यक सेविका या महिलेने याबाबत मुख्य सेविका शेगाव हिला माहिती देऊन याबाबत अवगत केले परंतु मुख्य सेविका ही आज दि. 8 जुलै ला सकाळी प्रवीणला फोन करून बोलविले सुरुवातीला प्रवीणच्या या घटनेच्या प्रकाराबद्दल तिने उडवा उडवी उत्तर दिले शेवटी याबाबत पुरवठा विभागाकडे याची तक्रार वरोरा येथे द्या म्हणून सांगितले प्रवीणने पंचायत समिती वरोरा गाठून बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना याची संपूर्ण माहिती देत या प्रकारावर संबंधित पुरवठा विभाग तसेच कर्मचारी वर्गावर त्वरित कारवाही करावी याबाबतचे निवेदन देण्यात आले. गर्भवती महिला लहान मुलांना मिळणाऱ्या पोषण आहारामध्ये अशा घटना घडल्याने त्यांच्या जीवाशी पुरवठा विभाग, शासन जीवाशी तर खेळत नाही ना, असा प्रश्नही आता निर्माण होत आहे. संबंधित अधिकारी पुरवठा विभागावर काय कार्यवाही करणार याकडे गावातील जनतेचे लक्ष लागले आहे.