अकोला ( प्रतिनिधी ) - आपल्या मराठी चित्रपटाला साता समुद्रापार डंका वाजऊन... अमेरीकेच्या फॉर्ब्स मॅगझिंन पर्यन्त मजलं मारलेल्या.. आणि अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार ना गवसणी घातलेला.. पल्याड चित्रपटाचे कथा पटकथा आणि संवाद लेखक के. सुदर्शन यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत.. त्याच्या विषयी थोडक्यात सागायचे झाल्यास ते सिनारियो प्रोडक्शन हाऊस ओनर, प्रोड्युसर, लेखक, दिग्दर्शक, कास्टिंग डिरेक्टर, स्टोरी रायटर, स्क्रीन प्ले रायटर, अशा अनेक विविध विभागात कमी कालावधीत स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणार एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व
...तु म्हनालास की लेखक होण्यासाठी वाचन आणि लेखनातल व्याकरण समजने अवश्य आहे लेखन हे एक अभिव्यक्त स्वातत्र्यं आहे तु कसा बघतो या सर्व गोष्टीकडे. ?
वाचन आणि लेखन ही तर काळाची गरज आहे ते म्हणतात ना वाचाल तर वाचाल ते तंतोतंत खंर आहे कारण आजच्या डिजिटंल युगात वाचना साठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत मला अस वाटतेय लेखक घडले पाहीजे,.. नाही फुल टाईम तर छंद म्हणुन कथा, चारोळ्या,कविता, किवा सोशल साईटसाठी ष्लॉग लिहून ही पैसा कमावता येतो आणि अनेक रिटायर्स माणस सेंकन्ड ईनिंग म्हणुन लेखक म्हणुन कार्य करतात त्याला एक छंद म्हणुन बघतात मला अस म्हणायचेय की अभिव्यक्त स्वातंत्र्य म्हटल तर त्याला लेखन कीवा पत्रकारीता हा पर्याय असु शकतो ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला आपण निरक्षर मानतो. निरक्षरता हे मागासलेपणाचे लक्षण आहे. भाषणाप्रमाणे लेखनही आपले मनोगत व्यक्त करण्याचे साधन आहे. लेखनाद्वारे आपण आपल्या भाव, विचार व कल्पनांची अभिव्यक्ती करतो. भाषणाद्वारे आपले विचार फक्त काही श्रोत्यांपर्यंत पोहोचतात. पण लेखनाद्वारे मांडलेले विचार दूरदूरच्या वाचकांपर्यंत पोहोचतात. बोललेले आठवणे कठीण असते. पण जे लिहिलेले असते त्याचे वारंवार वाचन करणे शक्य असते. लेखनाला सामाजिक दृष्टीने फार महत्त्व आहे. लोकांना सुसंस्कृत, जागरूक व सुजाण नागरिक बनविण्याचे कार्य लेखनातून प्रभावी होते. आज प्रत्येक व्यक्तीला लेखन कौशल्य प्राप्त करणे अनिवार्य झालेले आहे. आपले विनंती अर्ज, तक्रारी, निवेदन लिहून सादर करावे लागतात. याप्रमाणे लेखन कौशल्य प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचे एक महत्त्वाचे अंग बनले आहे. त्यासाठी लेखक घडले पाहीजे त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेल त्यात प्रेक्षकांचा ही सहभाग हवा ही प्रामाणिक इच्छा.. बाकी काय..
तुझ्या या पल्याड ने राष्ट्रीय आतंर-आंतरराष्टीय पातळीवर ऐकुन कीती अँवार्ड मिळवलेय ?
अँवार्ड तर खुप सारे मिळाले त्यात मला आठवताय ते सागतो..
अमेरिकेच्या फोर्ब्स मॅगझिनने पल्याडची दखल घेतली आणि त्यांच्या ऑनलाइन पोर्टलवर चित्रपटाची संपूर्ण मुलाखत छापली तसेच, महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 53 व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पल्याडची निवड केली होती.
सिनेक्वेस्ट फिल्म आणि व्हीआर फेस्टिव्हल, यूएसए
रिचमंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, यूएसए
आशिया फिल्म वीक, चीन
आशिया फिल्म आर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, हाँगकाँग
दक्षिण आशियाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, टोरोंटो
बोइडॉन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, स्वीडन
सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ढाका
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, टोकियो
दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव मॉन्ट्रियल
१२व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात नवी दिल्ली
कॅलेला फिल्म फेस्टिव्हल, स्पेन
ब्लॅक स्वान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, कोलकाता
कोकण मराठी चित्रपट महोस्तव, रत्नागिरी
गंगटोक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, सिक्कीम
अंबरनाथ मराठी चित्रपट महोस्तव, मुबई
नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, नवी दिल्ली
आणि आतांच काही दिवस आधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मुंबई 2023,
मला "पल्याड" या मराठी चित्रपटासाठी दोन महत्त्वाच्या विभागात पुरस्कार मिळाली "सर्वोत्कृष्ट लेखक" आणि "सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक" ...
नवोदीत कलाकांराना काय सागनार..
- नवोदीत कलाकांराना ऐवढच सागेल की अडचणी किती ही आल्या तरी स्वप्न खुप मोठी बघा..कारण स्वप्न बघायला पैसा लागत नाही पण पुर्ण करायला मेहनत लागते त्या स्वप्नाचा पाटलाग करा.. अडचणी येतील.. हरल्या सारख वाटेल थाबु नका कारण पुढच्याच गावात स्वप्न आपले वाट बघत असते त्या स्वप्नाला त्या गावा पल्याड सोबत घेऊन पुढे जा..
खर सागतो जगातला सर्वात मोठा आनंद ना आपली स्वतःची स्वप्न पुर्ण करण्यात आहे नाही की दुसर्याची... त्या साठी स्वतःची स्वप्न पुर्ण करण्यात स्वतःला व्यस्त ठेवा.. यश तुमचंच आहे आणि तोच आंनद शेवट पर्यन्त आपल्या सोबत असतो मरे पर्यन्त...
आपल्या प्रतिक्रिया द्या....