वर्धा ( किशोर मुटे) : वर्धा येथील समाज कल्याण भवनात दि.१५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार होत्या.त्यांनीच उपस्थित अतिथींसमवेत या कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वर्धा न्यायाधीश पी.आर.पाटील ,पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वर्धा न्यायाधीश एम.आर.खनके, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसिलदार रमेश कोळपे, समाजकल्याण सहा.आयुक्त पी.जी.कुलकर्णी, महावितरणचे अधिक्षक अभियंता महावितरण अशोक सांवत, कार्यकारी अभियंता (प्रशासन) संजय वाकडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य किशोर मुटे, सचिव अखिल भारतीय ग्राहक परिषदेचे जिल्हा सचिव , जिल्हा पुरवठा अधिकारी, जि.ग्रा.सं.प. आर.डी.बेंडे, सहा नियंत्रण वैध मापन शास्त्र वर्धा /नागपूरचे विजय झोटे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी वरुणकुमार सहारे, पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रज्वल पाथरे, अ.भा.ग्रा.पं.चे वर्धा जिल्हाध्यक्ष भाऊराव काकडे, सचिव विनोद पोटे, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून समारंभाचे रितसर उद्घाटन करीत दोन्ही महापुरूषांना अभिवादन करण्यात आले. सौ. कल्याणी किशोर मुटे यांनी ग्राहक गीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली.
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आपल्या मनोगतातून ग्राहकदिन आणि नागरीकांच्या हक्कांसंबंधी महत्वाची माहिती देऊन लोकशाहीचे महत्व अधोरेखित केले. त्याचप्रमाणे महापुरूषांच्या व्यक्तीमत्वाचा परिचय देऊन ग्राहकदिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथींनीसुध्दा आपली मनोगते व्यक्त करून ग्राहकदिन व ग्राहक नागरिकांचे हक्क तथा अधिकार विषद करून ग्राहकदिनाच्या शुभेच्छा व्यक्त करीत अन्याय,अनाचाराला प्रतिबंध करून न्यायासाठी सहकार्याचे अभिवचन यावेळी दिले.

जिल्हा संघटक तथा सचिव किशोर मुटे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची स्थापना १९७४ साली झाल्याची माहिती देऊन व ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रमुख मसुदे अखिल भारतीय ग्राहक पंचायतने तयार करून त्यावेळच्या ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न केले. माधव जोशी, अॕड मुंदडा व राजाभाऊ पोकळी यांनी ते संमतीला पाठविले, सन १९८६ मध्ये नविन ग्राहक कायदा अंमलात आल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. याप्रसंगी प्रथम स्वागतसमारंभात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे तहसिलदार रमेश कोळ,पे प्रज्वल पाथरे, अविनाश नागदेवे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अश्विनी पडोळे यांनी, प्रास्ताविक वरुणकुमार सहारे तर आभार प्रदर्शन दिनेश कुरसाडे यांनी केले. या कार्यक्रमाला तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक महेश थेरे, पुरवठा निरीक्षक निलेश राऊत आणि कुंभलकर काॅलेजचे व तलमले काॅलेजचे विद्यार्थी व तहसील कार्यालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय गिताने कार्यक्रमाची सांगता करून समारंभ संपल्याचे किशोर मुटे यांनी जाहीर केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....