वाशिम/कारंजा (लाड) : शासनाने काही वर्षांपूर्वी आधारकार्ड त्याला कोणताच आधार न घेता, चुकीच्या व अंदाजे जन्मतारखा टाकूनच आधार कार्ड वितरीत करण्यात आले.आता मात्र, जन्मतारखेच्या आधारकार्ड अपडेट करीता,ग्रामपंचायत, नगर पालिका,महानगरपालिकेचे दाखले म्हणजे कोतवाल बुकाच्या नोंदी मागण्यात येत आहेत. यामध्ये मला महत्वाचे नमूद करावेसे वाटते की,आज जी हयात,वयोवृद्ध मंडळी आहेत. त्यांच्या जन्माच्या काळामध्ये, अर्धे अधिक जन्म त्यांच्या आईवडिलांच्या राहत्या घरात व्हायचे.तेव्हा आशिक्षततेचे प्रमाण जास्त होते व जन्माची नोंद कोठे करायची ? कशी करायची ? जन्मनोंदीचे फायदे तोटे काय ? त्याकाळच्या अशिक्षित लोकांना काहीच कळत नव्हते.त्यामुळे बहुतांश वयोवृद्धाच्या नोंदी उपलब्ध नाहीत.तसेच त्याकाळचा सर्वच धर्मातील मजूरवर्ग,भटक्या जमाती,विमुक्त जातीचे आणि भटकंती करणारे लोक पोटापाण्याकरीता अनेक गावोगावी भटकंती करीत असत. त्यामुळे त्यांचा जन्म कुण्या गावी झाला असावा ? त्यांचे जन्मस्थळ कोणते ? हे देखील बऱ्याच भटक्या विमुक्त आणि सर्वच धर्माच्या मजूरवर्गांना अवगत नाही.
तसेच त्याकाळातील शिक्षक किंवा मुख्याध्यापक सुद्धा अंदाजे जन्मतारखा टाकूनच शाळेच्या दाखल खारिजमध्ये त्यांची जन्मनोंदणी करून घ्यायचे. त्यामुळे जन्मतारखेचा तो एकमेव पुरावा अनेक वयोवृद्धाकडे उपलब्ध असतो.
परंतु आज आधार अपडेट केन्द्रावर या एकमेव पुराव्यावरून जर आधार कार्ड जन्मतारिख अपडेट करून मिळत नसेल.तर अशा वयोवृद्धांनी काय करावे ? कोठे जावे ? शासनाच्या श्रावण बाळ निवृत्ती (वृद्धापकाळ) योजना व इतरही विविध योजनांपासून शासन त्यांना वंचितच ठेवणार काय ? ज्यांच्या जन्माची नोंद (कोतवाल बुकाची नक्कल) नाही. त्यांचे आधार अपडेट करण्याकरीता शासनाने काहीतरी पर्यायी मार्ग काढावा. व त्यांना वाऱ्यावर न सोडता श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून द्यावा.असी मागणी दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी तहसिलदार कुणाल झाल्टे यांचेकडे लावून धरली आहे.