कारंजा : एका चोराने दुचाकी चोरून पसार झालेला दुचाकी चोर अखेर पोलिसांनी पकडून त्याला अटक केली आहे. दुचाकीसह चोर पुसद येथे अटक करण्यात आल्यावर कारंजा शहर पोलिस स्टेशचे पोलिस निरिक्षक आधारसिह सोनोने यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ खोलेश्वर खुपसे, पोलिस नाईक उमेश बिबेकर पो कॉ नितीन व होमगार्ड यांच्या मदतीने पोलिस स्टेशन वसंतनगर पुसद येथून आरोपीसह जप्त करण्यात कारंजा शहर पोस्टला यश आले आहे . याबाबत वृत्त असे की, कारंजा शहरातील काजी प्लॉट निवासी फिर्यादी मोहम्मद खालिद मोहम्मद अस्लम नगरीया यांची दुचाकी क्रं एम एच 37 एस 7040 ही अज्ञात चोरट्याने दि 14 मार्च रोजी त्यांच्या घरासमोरून चोरून नेलेली असल्याने त्यांनी तशी तक्रार नोंदवीली होती .त्यावरून जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चनसिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे, पोनि आधारसिह सोनोने यांच्या मार्गदर्शनात सदर गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यात कारंजा शहर पोस्टेला यश प्राप्त झाले आहे. असे वृत्त कारंजा शहर पोलिसांकडून प्राप्त झाल्याचे संजय कडोळे यांनी कळविले .