कारंजा : स्थानिक विवेकानंद इंग्लिश प्राथमिक शाळेत दि. २९ मे रोजी महाराणा प्रताप राजपूत संघटनेद्वारे धर्मरक्षक महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सर्व प्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. गणेशसिह पवार,नंदकुमार चंदेल यांनी राणाजीच्या प्रतिमेचे पूजन केले,उदयसिंग ठाकूर,परेश ठाकुर (मुख्याध्यापक),सावन चंदेल अशोकसिंग बैस यांनी राणाजींच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.पहलगाम आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या २६ भारतीय नागरिक तसेच ऑपरेशन सिंदूर मधे शहीद भारतीय सैनिक यांना कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकीस्तानातील आतंकी अड्डे उध्वस्त करून पाकीस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडणारे भारतीय वीर सैनिकांना व भारत सरकारच्या धाडसी निर्णयाबद्दल भिनंदन करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात संगठनेचे अध्यक्ष उदयसिंह ठाकुर यांनी राणाजीच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला,विदर्भ कर्णि सेनेचे उपाध्यक्ष संदेश चव्हाण यांनी संघटनेची माहीती सादर केली . सौरभ ठाकुर यांनी सर्वांनी संघटनेच्या ध्वजाखाली एकत्र काम करण्याचे आव्हान केले. केशवसिंह चंदेल,अनिलसिंह वैस समर ठाकुर,रूपचंद कथाने रोशन ठाकुर,देशमुख,गणेशसिह आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन संदेश चौहान यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.स्वप्निल ठाकूर यांनी केले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.