कारंजा (लाड) : तालुक्यातील ग्रामिण भागात कारंजा ते यवतमाळ मार्गावरील सोमठाणा या खेडेगावी आज महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे तथा उमेश अनासाने यांनी भेट दिली असता, अंदाजे पंचाहत्तर ते ऐंशी वर्षे वयाचे सद्गृहस्थ मधुकर पाटील गावंडे यांची भेट झाली त्यांनी "एक ऊब जाणीवेची"या सामाजिक संस्थेच्या उपक्रमाची माहीती देत "एक ऊब जाणीवेची" हा सामाजिक उपक्रम राबविणारा मित्रपरिवार आमची आणि आमच्या सारख्या शेकडो निराधार व बेसहारा परिवाराची स्वतःची मुलं ज्याप्रमाणे काळजी घेत असतात.त्यापेक्षाही जास्त काळजी घेत असल्याची माहीती दिली.त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. "दुदैवाने काही वर्षापूर्वी माझी दोन मुले,स्नुषा,नातवंड व मुलगी एका स्वयंपाकाच्या गॅस अपघात दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्यामुळे आम्ही पूर्णपणे बेसहारा व निराधार झालेलो आहोत." वृद्धापकाळाने आमच्याकडून उदरनिर्वाहा करीता कामधंदा करता येत नाही. त्यामुळे आमचे हाल होत आहेत. ही बातमी जेव्हा "एक उब जाणीवेची"परिवाराचे मोहित गावंडे व मित्रमंडळीना मिळाली तेव्हा त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून आमचे पालकत्व स्विकारून आम्हाला दत्तक घेतले.गेल्या सहा महिन्यापासून हा परिवार आम्हाला दरमहा, महिनाभर पुरेल एवढा किराणा देत आहे.दिवाळीला त्यांनी किराणा माला सोबत कपडे दिले. हिवाळ्यात त्यांनी गरम व उबदार स्वेटर्स दिले. शिवाय मोहित गावंडे हे आमच्या आरोग्याची विचारपूस करून,आमचेशी पोटच्या मुलाप्रमाणे हितगुज करीत असतात.असे "एक ऊब जाणीवेची"संस्थेप्रती आभार व्यक्त करीत,डोळ्यात पाणी आणून मधुकर पाटील गावंडे काका व गावंडे काकू यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे व उमेश अनासाने यांना सांगीतले आहे.