युवाक्रांती समाचार
संजय कडोळे वाशीम जिल्हा प्रतिनधी
कारंजा : भारताच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधीत, कारंजा येथील (ईरो फिल्मस) कारंजा द्वारे, स्वतंत्र दिनाचे पूर्वदिनी, स्वातंत्र अमृत महोत्सव राष्ट्रिय एकात्मता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते .

पदयात्रेत कारंजा येथील अभिनेते, प्रकाश गवळीकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, शिवमंगल राऊत यांनी कर्मयोगी गाडगेबाबा, विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी देशभक्ताची भूमिका साकारली. या यात्रेत कलावंत आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वधर्मिय, सर्वपक्षिय कार्यकर्ते, सहभागी झाले होते. पदयात्रेचा शुभारंभ डेडूंळे कॉम्लेक्स अशोकनगर कारंजा येथून, तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला हारार्पण व अभिवादन करून करण्यात आला. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने जयस्तंभ चौक येथे पदयात्रा पोहोचताच, शहिदांना अभिवादन करून, स्थानिक इन्नानी जीनचे मैदानात, देशभक्ती गीतांनी समारोप करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी, कारंजा न प चे मुख्याधिकारी- दादाराव डोलारकर हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे हे होते. तर विशेष अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, ईरो फिल्मसचे अध्यक्ष आय के परमार, दलितमित्र रामबकसजी डेडूळे, माजी सैनिक शिवाजीराव गायकवाड आणि विलास ठाकरे , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी पोलिस अधिकारी राजुभाऊ अवताडे, सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा गायीका सौ अर्चना तोमर, सौ कांचन डेंडूळे इ ची उपस्थिती होती. याप्रसंगी देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रमात, राष्ट्रगीतानंतर सौ अर्चना तोमर यांनी लता दिदीच्या सुमधूर आवाजातील "ऐ मेरे वतन के लोगो . " या गीताने उपस्थितांची चांगलीच दाद मिळवीत शुभारंभ केला . त्यानंतर राहुल सावंत, इम्तियाज लुलानिया, रोमिल लाठीया, दादाराव सोनिवाळ, हफिजखान यांच्या देशभक्तिपर गीतांनी रंगत आणली. कार्यक्रमात महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त मंडळीमध्ये दलित मित्र रामबकसजी डेंडूळे, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त कारंजातील एकमेव साहित्यीक लोककलावंत पत्रकार तथा दिव्यांगसेवक संजय कडोळे, समाजभूषण शिवमंगल राऊत, समाजभूषण प्रकाश गवळीकर यांचा तहसिलदार धिरज मांजरे तथा मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांचे हस्ते जाहिर सत्कार करण्यात आला . सोबतच चित्रपट निर्माते आय के परमार, दिग्दर्शक रोमिल लाठीया, इम्तियाज लुलानिया , डॉ ज्ञानेश्वर गरड चित्रपट अभिनेते समशेरखान आणि बेलबागकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी डोलारकर तथा तहसिलदार मांजरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थिती देवून "आज आपण अमृत महोत्सव साजरा करीत आहोत .२०४७ मध्ये भारतिय स्वातंत्र्याची शताब्दी पूर्ण करू असे सांगताना देशाला देशप्रेमाने विकसित करण्याची आपली जबाबदारी असल्यामुळेच शासनाने "घर घर तिरंगा,हर घर तिरंगा ।" हा उपक्रम राबविला असल्याचे सांगीतले." कार्यक्रमाला न प चे माजी उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पूवाले, एड संदेश जिंतुरकर, राजीक शेख, नंदकिशोर कव्हळकर, सुनिल गुंठेवार , गोपिनाथ डेंडूळे, आरिफभाई पोपटे, कारंजा न प चे आरोग्य अधिकारी विनय वानखडे व शेकडो कारंजेकरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम संचलन प्रणिता कुसूम दिनेशचंद्र दसरे यांनी तर प्रास्ताविक व आभार कार्यक्रमाचे आयोजक इम्तियाज लुलानिया यांनी मानले .
आपल्या प्रतिक्रिया द्या....