ओबीसी चे तरुण व प्रबोधित युवा कार्यकर्ते माननीय जगदीश पिलारे यांची ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या अध्यक्ष पदी मुख्य संयोजक बळीराज धोटे यांनी नियुक्ती केली आहे.
श्रीयुत जगदीश पिलारे व जेष्ठ मार्गदर्शक श्री भाऊरावजी राऊत यांच्या आणि सहकार्यांच्या प्रयत्नाने ब्रम्हपुरी तालुक्यातील तीन ते चार हजार ओबीसीनी चंद्रपूर येथे संविधान दिनी दि. 26 नोव्हे 2020 ला आयोजित विशाल मोर्चामध्ये भाग घेतला होता.
श्री जगदीश पिलारे आगामी काळात ब्रम्हपुरी तालुक्यात तसेच आजूबाजूच्या तालुक्यात आणि गाव खेड्यात ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या माध्यमातून ओबीसीचे प्रबोधित कार्यकर्त्यांचे संघटन उभे करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील अशी अपेक्षा मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी व्यक्त केली असून त्यांच्या भावी काळातील कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.