सध्या भोंदू बुआ बाजींचे साम्राज्य दिवसेंदिवस पसरत असुन यांच्या अंधश्रद्धेच्या आहारी ओबीसी बांधव जात असुन आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल भोंदू बुवा बागेश्वर सारखे हे लोक बोलतात. हे आपण थांबवणार आहोत की नाही? कुठे तरी हे थांबले पाहिजे .आज एखाद्या समाजातील बहुसंख्य एका जातीच्या जगतगुरू संतावर अपमानास्पद भाषेचा वापर करून सामाजिक तेळ निर्माण करणे आज संत तुकाराम महाराजांबद्दल बदनामीकारक भाष्य करने भविष्यात दुसऱ्या जातीच्या संतावर असेच वक्तव्य भोंदू बुआ करतील असेच वक्तव्य बहुजन समाजातील संतावरील वक्तव्य थांबवायचे असेल तर सर्व समाज बांधवांनी निषेध करुन अश्या भोंदू बाबा वर आंदोलन व निषेध करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध समाजांनी मागणी केली पाहिजे
यावर आळा घालण्यासाठी नक्की काय अजेंडा आहे या लोकांचा? हा 25-26 वर्षांचा बाबा याला संत तुकारामांचे किती अभंग पाठ असतील? त्यालाच माहीत पण बागेश्वर म्हणतो त्यांना बायको मारायची म्हणून देव देव करायला लागले असे कुठल्या पुस्तकात लिहिले आहे ? याचे उत्तर या बुवा आणि त्याचे समर्थन करणाऱ्या त्याच्या हिंदू भक्त मंडळीनी द्यावे. संत तुकाराम महाराज आणि त्यांची पत्नी यांच्याबद्दल अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या पळपुट्या भोंदू भागेश्वराचा भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपुर चे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल यांनी जाहीर निषेध