पिंपरी चिंचवड पुणे: श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई प्रतिष्ठान व लेवा युवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ह्या महिन्यात दिनांक 12 तारीख शुक्रवारपासून सोहळ्याला सुरुवात होणार आहे. ह्या कार्यक्रमाची सांगता दिनांक 16 तारखेला होणार आहे. दिनांक 12 तारखेला कलश मिरवणूक, कलश पूजन, कलश स्थापना आदिशक्ती मुक्ताबाई मूर्तींची मिरवणूक ,व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 रोजी देवीचा अभिषेक, मूर्ती फुलांमध्ये ठेवणे तसेच महिला भजनी मंडळ, गजानन नगर दिघी येथील भजनी मंडळाचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होईल. तसेच त्याच दिवशी चार वाजता सुप्रसिद्ध समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार अपंग ह भ प डॉ.रवींद्रजी भोळे उरुळी कांचन यांचे सुश्राव्य प्रवचनाचा कार्यक्रम होईल. श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश ज्योत टाकणारे तसेच "ताटी उघडा ज्ञानेश्वरा"या विषयावर प्रबोधनात्मक प्रवचन होईल. दिनांक 14 रोजी देवीचा अभिषेक व मूर्ती धान्य ठेवणे समारंभ होईल. ह्याच वेळी एक लक्ष दीपक प्रज्वलनाचा कार्यक्रम होईल व महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. दिनांक 14 रोजी देवीचा अभिषेक व मूर्ती धान्य ठेवण्याचा समारंभ होईल. ह्याच वेळी सकाळी दहा वाजता ह भ प चांगुना बाई चौधरी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. दिनांक 15 रोजी सोमवारला पुण्य वचन मातृका पूजन व देवी स्थापना नवग्रह ईशान्य पूजन व होम हवन होईल. सायंकाळी सहा वाजता महाआरती व महाप्रस