आरमोरी तालुक्यातील शिवनी वाळू घाटावरून वाळू वाहतूक करत असताना ब्रह्मपुरी येथील महसूल कर्मचारी यांनी दोन ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यांच्याकडे तीन ब्रासची रॉयल्टी असताना सुद्धा त्यांनी सहा ब्रास पेक्षा जास्त क्षमतेने वाळू भरून वाहतूक करीत असल्याचे दिसले. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालय ब्रह्मपुरी येथे दोन्ही ट्रक जमा केले. ही घटना आज दिनांक:-२१/११/२०२२ ला सकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास घडली आहे.
यावेळी अशी अवैध वाळूने भरलेली अनेक ट्रक नागपूर कडे रवाना झाली मात्र त्या ट्रकची कोणतीही तपासणी करण्यात आली नाही किंव्हा कारवाही करण्यात आली नाही.
वास्तविक ब्रह्मपुरी तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असतो. दिवस रात्र ही तस्करी सुरू असून यामध्ये मोजकेच वाहन पकडून कार्यवाही होत असल्याचे दिसून येतो एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू असताना सुद्धा या वाळू तस्करांवर कार्यवाही का होत नाही यामागचा गणित सर्वसामान्यांना ही ग्यात आहे.
व याबाबत बऱ्याच वृत्तपत्रात मधून वाळू तस्करीच्या बातम्या प्रकाशित होत असतात मात्र अवैध वाळू तस्करी थांबता थांबेना.!