राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे तथा कारंजा नगर परिषदचे मा. नगराध्यक्ष दत्तराज डहाके, राष्ट्रवादी नेते हाजी मो.युसूब पुंजानी यांच्या आदेशानुसार, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने, संपूर्ण जिल्ह्यातील पिके उध्वस्त झाल्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची गांभिर्याने दखल घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने,तहसिलदार कारंजा यांचे मार्फत, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे नुकसान भरपाई बाबत निवेदन पाठविले आहे. आपल्या निवेदनत राष्ट्रवादी काँग्रेसने, शेतकऱ्याच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला त्वरित मदत मिळावी, अशी मागणी कारंजा येथे एकदिवशीय धरणे आंदोलन करीत करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कारंजा तालूक्यातील पक्षातील सर्व विभागाचे पदाधिकाऱ्यांनी, समाज कल्याण जिल्हा परिषद वाशीमचे सभापती अशोक डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात तहसिलदारांकडे निवेदन दिले . यावेळी प्रामुख्याने चंद्रशेखर काटोले,अध्यक्ष कारंजा मानोरा मतदार संघ, डॉ रमेश चंदनशिव अध्यक्ष सामाजिक न्याय, सागर दुर्गे जिल्हा उपाध्यक्ष युवक, रऊफ मामू जिल्हा उपाध्यक्ष, योगेश इंगळे शहर अध्यक्ष सामाजिक न्याय कारंजा, धम्मप्रकाश गायकवाड अध्यक्ष कारंजा मानोरा सामाजिक न्याय, विक्रम डोंगरे, सरचिटणीस सामाजिक न्याय, वं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते असे वृत्त योगेश इंगळे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेकडे कळवीले आहे .