कारंजा : दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी विश्रामगृह कारंजा (लाड) येथे कारंजा-मानोरा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते,
पदाधिकारी,शेतकरी, नागरिक यांची संवाद बैठक संपन्न झाली या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करताना प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले प्रदेश संघटक तथा पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख प्रमोदजी टाले वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी कारंजा-मानोरा तालुक्यातील बहुसंख्येने उपस्थित असलेले परिसरातील शेतकरी, समाजसेवक पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. घरकुल व अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना रहिवाशांना मालकी हक्काचा नमुना-ड मिळून देणे, गायरान जमिनीवर अतिक्रमण करून शेतात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे देऊन सातबारा त्यांच्या नावे करून देणे,सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न,शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्याकरिता पांदन रस्ते उपलब्ध करून देणे इत्यादीसह विविध विषयावर चर्चा करून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकरता पुढाकार घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा असे सर्वानुमते संवाद बैठकीच्या चर्चा मध्ये ठरविण्यात आले .
त्यानंतर लगेच आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सलग दोन महिन्यापासून राज्यात थैमान घातलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग हा प्रचंड हैराण झालेला आहे. त्याचा फटका पश्चिम विदर्भाला व विशेष करून कारंजा मानोरा तालुक्यासह वाशिम जिल्हाला बसलेला आहे. सलग संततधार पाऊस अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान तर झालेत, त्याचबरोबर अनेक नदीकाठी असलेल्या शेतजमिनी पिकासह खरडून गेल्या,गावांमध्ये घरांची देखील पडझड झाल्यामुळे लोकांचे व जनावरांचे नुकसान झाले अशा नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकाची सरसकट आर्थिक नुकसान भरपाई तात्काळ देऊन वाशिम जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने दि.०९ सप्टेंबर २०२४ रोजी लक्षवेधी निवेदन मोहीम अंतर्गत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आलेली आहे.राज्यात अनेक ठिकाणी अधिकृत मान्यता नसलेल्या बी-बियाणीची विक्री कृषी सेवा केंद्राद्वारे केल्या गेल्यामुळे बियाणे पेरल्यानंतर सोयाबीनच्या झाडांना फुले व फळधारणा न झाल्यामुळे शेंगा लागल्या नाही त्यामुळे शेतकरी हा दुहेरी आर्थिक संकटात सापडलेला आहे आमच्या आमच्या पक्षाची शासनाकडे मागणी आहे की अशा प्रकारे मान्यता नसताना बोगस बी-बियाण्याची विक्रीची परवानगी देणाऱ्या संबंधितअधिकारावर खातेनिहाय चौकशी करून दोषी असल्यास कार्यवाही करावी व मान्यता नसलेले बोगस अनधिकृत बी बियाणे विक्री करणारे कृषी सेवा केंद्रचे परवाने तात्का रद्द करावे.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता पांदन रस्त्याचा प्रश्न हा शेतकऱ्यांशी अत्यंत निगडित असा प्रश्न आहे पांदन रस्त्याच्या सुविधेमुळे त्यांचे फार हाल होतात शेतकऱ्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. बंधन रस्ते अभावी शेतकऱ्यांना पेरणी वेळी बी बियाणे शेतातले नेहा करणे तसेच शेतात पिकलेल्या मालांची वाहतूक करून घरी आणणे शक्य होत नसल्यामुळे पीक तसेच शेतात खराब होऊन पडतात तीही समस्या दूर व्हावी यासाठी "पांदण रस्ते सुविधा आंदोलन" पक्षाच्या वतीने केल्या जाईल.
सुशिक्षित बेरोजगारांच्या बेरोजगारीची अत्यंत जटिल समस्या आहे. कारंजा-मानोरा तालुक्यात प्रलंबित असलेले एमआयडीसीचे प्रश्न मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे तथा उद्योग मंत्री यांच्याशी चर्चा करून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्याकरता पाठपुरावा करण्यात येईल त्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी कारंजा-मानोरा येथे एमआयडीसीच्या मार्फत उद्योगधंदे उभारण्यात यावे आणि हातगाडीवर व्यवसाय करणारे लघु व्यावसायिकांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न केल्या जाईल.
भूमीहीन शेतकऱ्यांना कसत असलेल्या अतिक्रमित जमिनीचे मालकी पट्टे. व सातबारा मिळावे, शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून निवासी प्रयोजनार्थ बांधलेल्या झोपड्यांना, घरांना नमुना- ड देण्याच्या दृष्टीने पक्षाच्यावतीने सातत्याने राज्य सरकारकडे पक्षाच्या पाठपुरावा केल्या जात आहे. आगमी २०२४ च्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा पक्ष सर्व शक्तीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टी द्वारा राज्यात ३३ जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये पश्चिम विदर्भातील आठ जागा निश्चित केल्या गेल्या आहे, त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातून कारंजा लाड- मानोरा व वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघ लढविल्या जाईल.विशेष म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार तथा लॉंग मार्चचे प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी कारंजा लाड विधानसभे करिता उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी महापौर तथा चार वेळा विद्यमान सभापती असलेले प्रमोद टाले पाटील यांच्या नावाची उमेदवार म्हणून ०१ सप्टेंबर २०२४ रोजी पक्षाच्या अमरावती विभागीय संवाद परिषदेत अधिकृत घोषणा केलेली आहे आणि आमचा पक्ष कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघात मोठ्या ताकतीने कामाला देखील लागलेला आहे. पत्रकार परिषदेला पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले,
कारंजा-मानोरा विधानसभा क्षेत्राचे घोषित अधिकृत उमेदवार प्रमोद टाले पाटील,वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी पत्रकारांनी यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाची अभ्यासपूर्ण सविस्तर असे उत्तरे देऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाला समाजसेवक चांदभाई मुन्नीवाले,विजय गागरे विनायक वरघट, बाबाराव डोंगरदिवे,दादाराव डोंगरदिवे, मोहसीन भाई,अब्दुल भाई हंसराज लोणारे,गोविंदराव चौधरी हिरामण पाटील,संतोष मानके, विनोद सावते,गोपाल सोनुलकर,जगन पंडित, बळवंत अवघाते, प्रल्हाद शहाकार, दिनेश आगाशे, मंगेश आगाशे, अनिल खंडारे, विनोद पाटील, रणजीत राठोड,शरद शेटे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते, शेतकरी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कारंजा तालुका अध्यक्ष तथा वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख विलास राऊत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला व पक्षांचे घोषणा केलेले अधिकृत उमेदवार प्रमोद काळे पाटील यांना कारंजा मानोरा मतदार संघातून जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचा निर्धार केला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....