जिल्हा परिषद मराठी प्राथमिक केंद्र शाळा आरमोरी येते नुकताच माजी विध्यार्थी सन (1986--89 ) यांचे वतीने शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
आज जि. प. मराठी केंद्र शाळेला 103 वर्ष
पुर्ण झाले. त्या निमित्ताने सन 1986-89 या वर्षीच्या माजी विध्यार्थी कडून दरवर्षी शाळेत विविध कार्यक्रम घेत असतो. आज शाळेच्या वर्षपूर्ती निमित्ताने शाळेत वृक्षरोपण करण्यात आले. ज्या शाळेत आम्हाला 'अ' पासून शिक्षणाची सुरवात झाली त्या 'अ' चा अभिमान आम्हाला आजही आहे 'अ' म्हणजे अक्कल, 'अ' म्हणजे आज्ञाधारी, 'अ' म्हणजे अस्मिता, 'अ' म्हणजे आपलेपणा अशा अनेक अलंकारांनी सुशोभित या शब्दाला अर्थ आहे... म्हणुनच आपल्या जिवनाला शिस्तबद्ध वळण लावण्यार्या शाळेला आपल्या हृदयातून मायेची भेट म्हणुन हा उपक्रम... एक भेट, एक प्रेम, एक आपुलकी, एक नाते, एक कर्तव्य.... माझी शाळा 1986-89 बॅचचे माजी विद्यार्थी नवनाथ कुंभारे. गणेश बैरवार. सुशील खोब्रागडे. भगवान बनसोड. सुनील ढेंगरे . नासीर शेख. अमोल मारकवार. कल्पना पराते . व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.