वाशिम : प्रजापिता ब्रह्मकुमारी शाखा,वाशिम यांच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी एक विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'डिजिटल तंत्रज्ञान : आव्हाने, संधी आणि पत्रकारितेची नवी दिशा' या विषयावर सखोल चर्चा व मार्गदर्शन यासाठी दिनांक 2 ऑगस्ट 2025, शनिवार रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात वाशिममधील सर्व संपादक, पत्रकार, प्रतिनिधी आणि मिडिया क्षेत्रातील कार्यकर्ते यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर आधारित या चर्चासत्रात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार असून, उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
नोंदणी आवश्यक :
कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्यांनी निमंत्रण पत्रिकेत दिलेल्या लिंक किंवा QR कोडवर क्लिक करून आपली नावनोंदणी करावी,असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यामुळे नियोजन अधिक प्रभावी पद्धतीने करता येईल.
संपूर्ण पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन
प्रजापिता ब्रह्मकुमारी शाखा, वाशिम यांच्या वतीने करण्यात आले आहे.असे वृत्त मिळाल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी सांगीतले .