भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा आरमोरिच्या वतीने आयोजित दहा दिवसीय बालसंस्कार शिबिरामध्ये धम्माबद्दल विविध विषयावर मुलांना मार्गदर्शन....
आरमोरी....
बाल वयातच बालकांच्या अंगी विविध संस्कार रुजवण्यासाठी व धम्मा संदर्भात मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा आरमोरीच्या वतीने दहा दिवसीय बालसंस्कार धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले व विविध विषयावर बालसंस्कार शिबिरामध्ये मार्गदर्शन करून बालकांना प्रेरित करण्यात आले नुकतेच हे बालसंस्कार शिबिर मोठ्या थाटात संपन्न झाले.
सदर बालसंस्कार शिबिरामध्ये दहा दिवस विविध विषयावरती मार्गदर्शन करण्यात आले त्यात प्रामुख्याने बालसंस्कार शिबिराचे महत्त्व, वंदना आणि पंचांग प्रणाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण, त्रिशरण पंचशील पंचांग प्रमाण, त्रिशरण पंचशीला चा अर्थ आणि महत्त्व , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थ्यांना संदेश, सिद्धार्थ गौतमाचे बालपण, धम्म प्रतिज्ञा आणि बौद्धांची मुलं कशी असावी, बौद्धांचे सण आणि मंगल दिन ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थ्यांना संदेश भारत बौद्ध महासभा की मातृसंस्था... या सर्व विषयावरती अनुक्रमे धर्माजी बांबोळे बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षिका रसिकाताई इंदूरकर, सौ. भारती अमरदीप मेश्राम, देशपांडे सर प्रदीप कुमार रोडगे सर, अंजलीताई रोडगे मॅडम,इत्यादींनी मोलाचेमार्गदर्शन केले.
समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका शाखेच्या अध्यक्षा सौ.भावनाताई बारसागडे होत्या तर प्रमुख अतिथी स्थानि भारतीय बौद्ध महासभेच्या आरमोरी शहर सर शाखेच्या अध्यक्षा कल्पनाताई ठवरे , गडचिरोली जिल्हा शाखेच्या सौ .कुमता मेश्राम ,केंद्रीय शिक्षिका रसिकाताई इंदूरकर माजी सभापती , वेणूताई ढवगाये मॅडम आदी उपस्थित होते.
दहा दिवसीय बालसंस्कार शिबिरा दरम्यान विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना धम्मदान दिले त्यामध्ये प्रामुख्याने प्रदीप रोडगे ,सर सौ.भारती अमरदीप मेश्राम ,सौ.रसिकाताई इंदुरकर ,अंजलीताई रोडगे, कुमता मेश्राम ,देशपांडे सर विजय वाकडे ,अजय शेंडे, हिरा खोब्रागडे ,सुगत बांबोडे ,विनोद बोरकर ,वेणुताई ढवगाये ,मीना सहारे आदींनी विद्यार्थ्यांना धम्मदान दिले. बालसंस्कार शिबिरामध्ये एकूण 50 विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला.
कार्यक्रमाचे संचालन सौ,भारती अमरदीप मेश्राम प्रास्ताविका सौ कुमुता मेश्राम तरआभार प्रदर्शन अनुराधाताई रामटेके यांनी केलं ,कार्यक्रमा च्या यशस्वी ते करिता भावनाताई बारसागडे ,कुमता मेश्राम ,कुंदा झाडे ,सुलभा बोरकर ,कल्पना ठवरे, अनुराधा रामटेके ,निर्मला मेश्राम , वनमाला सुखदेवे ,पुष्पा रामटेके, मीना सहारे ,भूमिका खोब्रागडे, रसिका इंदुरकर, अर्चना सहारे, शितल खोब्रागडे अपर्णा मेश्राम सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले,
.
आपल्या प्रतिक्रिया द्या....