कारंजा : आगामी श्री गणेशोत्सव, श्री नवदुर्गोत्सव मिरवणुकांच्या दिवशी, शासनाकडून तर सरकारी देशी दारूंचे दुकानं नियमा प्रमाणे बंद असतात. परंतु तरीही दुकानदाराच्या सहाय्याने इतर ठिकाणी अवैध दारूविक्री होत असल्याची चर्चा होतच असते शिवाय मोहाच्या गावरण दारुची सुद्धा सर्रास विक्री होत असल्याची सुद्धा चर्चा आहे. देशी दारू दुकाने बंद असूनही,काही चौका चौकांमध्ये दारुच्या नशेत झिंगणारे दारुडे सर्रास दिसून येत असतात. यात्रा, रॅली, मिरवणुका मध्ये तर ह्या दारुड्यांना व्यासपिठ मिळाल्या प्रमाणेच हे नाचत असतात. व भानगडीला कारणीभूत होत असतात ? त्यामुळे स्थानिक प्रशासनाने उत्सव मिरवणुकीच्या दिवशी अजिबातच कोणतीही दारूविक्री होणार नाही याकडे लक्ष्य देऊन दारुड्यांवर अंकुश ठेऊन शहरातील शांतता अबाधित ठेवण्याची मागणी होत आहे.