जय भवानी नवदुर्गा उत्सव मंडळ व उत्सव समिती यांच्या वतीने यावर्षी 19 वा नवरात्री महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शिवनगर येथिल अहिल्याबाई होळकर लेझीम ढोल पथकाने आपल्या उत्कृष्ठ कलाकृतीने ढोल लेझीम नृत्याचा आविष्कार करुन माताराणीचे गायवळ नगरीत थाटामाटात स्वागत कऱण्यात आले. लेझीम ढोल पथकाने या आगमन सोहळ्याचे खास आकर्षण निर्माण केले.मंडळाने यावर्षी जागर नवशक्तीचा जागर विचाराचा हे लक्षात घेवून नवही दिवस विवीध धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन भारुड, गोंधळ असे विवीध कार्यक्रमाचे आयोजन केलेलें आहे. तसेच गावातील सर्व भाविकांनी यामध्ये सक्रीय सहभागी होवून मंडळास सहकार्य करावे असे आव्हान मंडळाकडून कऱण्यात येत आहे. जय भवानी नवयुवक मंडळ गायवळ