अकोला -जि. प. प्रा. केंद्र शाळा भौरद येथे अकोला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या नियोजनानुसार शिक्षण परिषद घेण्यात आली परिषदेचे औचित्य साधून उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ रेखा तायडे स्वेच्छा सेवा निवृत्त झाल्यामुळे त्यांचा व मा रतनसिंग पवार हे अकोला जिल्हा परिषद मध्ये उपशिक्षणाधिकारी पदावर रुजू झाल्यामुळे त्यांचा सत्कार समारंभ सुद्धा घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश इंगळे होते कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी शाम राऊत तसेच शिक्षण विस्तार अधिकारी दीपमाला भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीचे आयोजन केले होते. शिक्षण परिषद मध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रम, गणित,भाषा सामाजिक शास्त्रे इत्यादी विषयांचे अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य या विषयावर सखोल मार्गदर्शन देण्यात आले तसेच प्रशासकीय सूचना देण्यात आल्या यासाठी शरद लौटे,गौतम तायडे, निलेश कवडे केंद्रप्रमुख माणिकराव सरदार त्यांनी सुलभक म्हणून आपली भूमिका पार पाडली सत्कार मूर्ती रतन सिंग पवार यांनी सर्व शिक्षकांना योग्य मार्गदर्शन केले. मागील पाच वर्षाच्या कालखंडात उच्च श्रेणी मुख्याध्यापिका रेखा तायडे यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला त्यामध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची विशेष क्रीडा साहित्य योजना तसेच सौरभ कटियार यांच्या कारकिर्दी मधील विशेष अशी क्रीडांगण निर्मिती योजना एचडीएफसी बँक यांच्या सामाजिक उपक्रमातील शौचालय निर्मिती,जलशुद्धीकरण यंत्र बसवणे नवीन इमारतीमध्ये तारेची फेंसिंग करणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम अशा प्रकारची भरीव कामगिरी केली. व कारकिर्दीत शाळेविषयी एकही तक्रार वरिष्ठ कार्यालयाकडे येऊ दिली नाही. कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता केवळ कर्तव्य भावनेने आपली सेवा पार पाडली म्हणूनआतापर्यंतच्या मुख्याध्यापका मध्ये सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून गौरवा चे स्थान राहील असे मनोगत पवार साहेब यांनी व्यक्त केले त्यामुळेच मी या ठिकाणी आलो आहे वश्री व सौ तायडे जोडीचा सत्कार करतांना मला अभिमान आहे अशा भावना व्यक्त केल्या.सौ रेखा तायडे आणि मनोहर तायडे यांनी मनोगत व्यक्त करून सहकाऱ्यांनी दिलेल्या भरीव सहकार्याबद्दल धन्यवाद दिले व शाळे च्या सर्वांगीण विकासासाठी दहा हजार रुपयाची भरीव देणगी दिली केंद्रप्रमुख माणिकराव सरदार शाळेला मिळालेल्या निधीचा शाळेच्या विकासासाठी कल्पकतेने आणि कौशल्याने वापर करतात हा माझा अनुभव आहे येथे देणगीचे चीज होते म्हणून दानशूर देणगीदारांनी भौरद जि प शाळेला देणगी द्यावी असे आवाहन केले.याप्रसंगी अकोला पंचायत समितीचे गट समन्वयक शशिकांत गायकवाड यांनी तायडे मॅडम त्यांना सेवा निवृत्ती निमित्त शुभेच्छा संदेश पाठवला.तसेच भौरद केंद्रातील मुख्याध्यापक संजय काळणे,प्रमोद मोकळकर,मंदाकिनी काळे, माधव काळे, सुनिता अनमाने सहदेव मेसरे, महेश अनमाने यांनी सत्कारमूर्ती पवार साहेब आणि तायडे मॅडम यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख माणिकराव सरदार यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश इंगळे यांनी सुद्धा आपल्या मनोगत गतातून शाळेच्या विकासाचा अहवाल सर्वांसमक्ष सादर केला सत्कार मूर्तिना शुभेच्छा दिल्या.अरविंद गा डगे, लीना भाकरे उज्वला शर्मा, यांनी मनोगत व्यक्त करून तायडे मॅडम ला चांगल्या आरोग्या साठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि स्वागत गीत चंद्रशेखर चतारे यांनी केले. प्रथम संस्थेचे वैभव निर्मल व ढगे सर यांनीही माता पालक गटाच्या अनुषंगाने निपुण भारत संदर्भात सर्व शिक्षकांना योग्य मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन माणिकराव सरदार यांनी केली शेवटी सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीरा डिघोळे, पुष्पा बोरसे, वर्षा बोर्डे, राणी गायकवाड सर्व शिक्षक वृंद व ग्रामपंचायत कर्मचारी आप्पा पन्हाळकर यांनी सहकार्य केले.