कारंजा : येथील मंगरुळवेशीवरील महाराणा प्रताप नगर येथील मराठा समाजाचे सामाजिक व स्वाभिमानी कार्यकर्ते,स्व.श्री. राजुभाऊ नामदेवराव ढोबळे यांचे बुधवार दि. o८ नोहेंबर २०२३ रोजी रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये ०१:०० वाजता दुर्धर आजारामुळे दु:खद निधन झाले.त्यांचे पाठीमागे २ मुले,स्नुषा,नातवंडे असा परिवार आहे. स्व.राजुभाऊ ढोबळे हे कारंजा येथील महाराणा प्रताप व्यायाम शाळेचे ते सक्रिय सदस्य होते.श्री गणेशोत्सव ,श्री नवदुर्गोत्सवामधे त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.परंतु गेल्या काही वर्षापासून ते आजार ग्रस्त असल्याचे कळते.स्वतःच्या मेहनतीने त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले होते.परंतु गेल्या काही वर्षापासून त्यांना कौटुंबीक दुःखाचा सामना करावा लागत होता.त्यातच काही दिवसा पासून ते दुर्धर आजाराने आजारग्रस्त झाले होते.त्यांचा अंत्यसंस्कार बुधवार दि.८ नोहेंबर २०२३ रोजी दुपारी ०१:०० वाजता,हिंदू स्मशानभूमी दारव्हा रोड येथे करण्यात आला यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्याकरीता बराच मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय काकडे व शेकडो आप्तेष्ट,मित्रमंडळी नागरीक,मराठा समाज संघ महाराणा प्रताप व्यायाम शाळा,आई कामाक्षा मित्र मंडळ, साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार कारंजाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यांच्या मृत्युमुळे मराठा समाजाचा एक सक्रिय व्यक्ती आपल्या मधुन निघून गेल्याची हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांचा सावडण्याचा आणि दशक्रियेचा नेम शुक्रवार दि.१० नोहेंबर २०२३ रोजी करण्यात येईल तरी आप्तस्वकीय व सोयरे यांच्या माहितीस्तव त्यांच्या परिवाराकडून कळवीण्यात आले आहे.