ब्रम्हपुरी तालुक्यातील तुलान माल या जंगल व्याप्त गावात रानबोथली मार्गावर अवैध दारू विक्री करणाऱ्यास ब्रम्हपुरी येथील पत्रकारांनी पकडुन पोलीसाचे स्वाधीन केले.
तुलान माल, धामणगाव व तुलान मेंढा या तीन गावांनी मिळून एक गट ग्रामपंचायत असून धामण गावात योग्य सुशासन राहावे यासाठी शासनाने पोलीस पाटील नियुक्त केले आहे. मात्र पोलीस पाटील यांच्या कार्य शेत्रात नियमित दारू विक्री होत असूनही आज पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने 23 आगॅस्टला अशीच अवैध दारू विक्री सुरु असल्याचे तुलान माल येथील सुशिक्षित युवा सरपंच यांनी पत्रकारांना माहिती दिली असता वेळ न घालवता घटना स्थळी जाऊन अवैध दारू विक्री सुरु असताना दारू विक्रेत्यास दारू विक्रीबाबत विचारणा केली असता दारू विक्री करत नसल्याचे सांगितल्याने सरपंच व ग्रापंचायत शिपाई यांनाही घटना स्थळी बोलावून घेतले व जंगलात लपवून ठेवलेली दारू शोधून काढली असता दारूच्या 120 लहान निपा ( टिल्लू ) मिळाल्याने पोलीसांना सूचना देण्यात आली. घटना स्थळी पोलीस येऊन दारू जप्त करण्यात आली. या पत्रकाराच्या धाडसी कारवाहीने सरपंच व उपसरपंच यांनी पत्रकारांचे आभार मानले.
यादरम्यान पोलीस पाटिल यांनाही अवैध दारू सुरु असल्याचे सांगितले असता मी बाहेर आहे असे उत्तर पोलीस पाटिल यांनी दिल्याने या अवैध दारू विक्री विक्रेत्याकडून गावातील विशिष्ट व्यक्तींना हप्ते दीले जात असल्याचे नाकारता येत नाही.