कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) :- दिनांक 23 जुलै 2023 रोजी भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचे पदाधिकारी, कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे चिरंजीव ज्ञायक पाटणी यांनी कारंजा तालुक्यातील किनखेड, धामणी ,वडगाव इजारा येथील पूरस्थिती मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मागील पाच दिवसापासून कारंजा तालुक्यात अतिवृष्टी ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे शेताचे पशुधनाचे घरांची पडझड असे नुकसान झाले आहे. वरील गावातील काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची पाहणी केली.

दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांची याविषयी चर्चा करण्यात आली. पूरस्थितीचा आढावा नांदेड वरील पुलावर जाऊन घेण्यात येऊन परिसरातील परिसर काही शेतीची पहाणी करण्यात आली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल कानकीरड, भाजपा तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे, पंचायत समिती सदस्य दिनेश वाडेकर व शुभम बोनके, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंगेश धाने, भाजपा तालुका सरचिटणीस संकेत नाखले, इत्यादीसह आमदार पाटनी साहेब यांचे स्वीय सहाय्यक सर्वश्री दिनेश उपाध्याय, सुभाष सुरोशे आणि संजय भेंडे या दौऱ्यात उपस्थित होते. किनखेड येथे सर्वश्री मनोहर दराडे, जिवन चव्हाण, संजय राठोड, ज्ञानदेव घुगे, हेमंत घुगे, संजय सोनोने, राजीव गुलबोले, देवीदास बढे, रामेश्वर बढे, विनोद दराडे .धामणी येथे सरपंच नितीन चक्रे ,मंगेश नेतनकर ,गणेश पवार, राजु खोंड, दहापुते गजानन, संजय लहानकर, अजय राउत, अजय धामणकर, तुकाराम खोंड, प्रमोद लोखंडे, सुडके गोपाल, बंडू लाहनकर गुगळे पटवारी, अमोल जाधव ,महादेव खडसे, नंदु घाटे व ईतर शेतकरी, तर वडगाव ईजारा येथे फिकिरा गायकवाड, उप सरपंच देवानंद राठोड, जि.प.माजी सदस्य मोहन महाराज,रमेश राठोड,संजय जाधव, चंदु जाधाव, प्रकाश पडाळे, तुकाराम महाराज, तारासिंग महाराज, अशोक खानबरड, वसंता काजळे, ग्रामसेवक गावंडे, पटवारी डांगे मॅडम , इत्यादीसह अन्य शेतकरी उपस्थित होते. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....