कारंजा : योजना महर्षी,कारंजा विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार तथा माजी राज्यमंत्री स्व.बाबासाहेब धाबेकर हे भविष्याबाबत दूरदृष्टी ठेवून समाजकार्य करीत असत.खऱ्या अर्थाने कारंजा विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीन विकास त्यांच्या काळातच झाल्याचे कटूसत्य आहे. मात्र स्व. बाबासाहेब धाबेकरांचे नंतर झालेल्या एकाही आमदाराने मात्र त्यांच्या कार्यकाळात मतदार संघाकरीता कोणतीही ठोस उल्लेखनिय कामगीरी केलेली नाही.गावातील किरकोळ रस्ता दुरुस्ती आणि सांडपाण्याच्या नाल्याच्या दरवर्षी उद्भवणाऱ्या समस्यांना ठोस कार्य म्हणताच येत नाही.दिवंगत आमदार स्व. बाबासाहेब धाबेकर भविष्यातील योजना आखीत कार्यरत असायचे,त्यामुळे त्यांनी कारंजेकरावर भविष्यात पिण्याच्या पाणी टंचाईचे संकट उद्भवू नये म्हणून काळजीपूर्वक,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कारंजा उपविभागामार्फत,पिंप्री फॉरेस्ट येथील अडाण प्रकल्प या धरणा मधूनच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन घेऊन नागरीकांच्या पिण्याच्या पाणीपुरवठयाची कायम स्वरूपी व्यवस्था करून ठेवलेली आहे.मात्र प्रचंड झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या लक्षात घेता दरवर्षी नागरीकांकडून पिण्याच्या पाण्याची मागणी वाढतच आहे. ही मागणी लक्षात घेऊन, विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेकरीता,मंजूरी देऊन,महाराष्ट्र शासनाकडून जास्तित जास्त विकास निधी खेचून आणून पाणीपुरवठ्याच्या होत असलेल्या कारंजेकरांच्या मागणीप्रमाणे पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करायला हवा.मात्र दुदैवाने गेल्या दहा वर्षापासून स्थानिक आमदार यांचे मनुष्य जीवनाशी निगडीत या महत्वाच्या जलसमस्येकडे सपशेल दुर्लक्ष्यच असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.गेल्या दहा वर्षापूर्वी वाढीव पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवून,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून नव्याने बांधण्यात आलेल्या वॉटरटॅक अपूर्णावस्थेत आहेत.शिवाय मंगरूळ वेशीमधून दहा वर्षापूर्वी टाकण्यात आलेली वाढीव पाणी पुरवण्याची पाईपलाईन सुरूच करण्यात आली नाही.त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नविन जोडण्या मिळत नसल्याने,शहरातील हजारो नागरीक जीवन प्राधिकरणच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून,जीवन प्राधिकरणचे पिण्याचे पाणी मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे मानवी जीवनाशी निगडीत पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याकरीता आमदार राजेंद्र पाटणी यांनी त्यांचे लक्ष्य वेधने गरजेचे असल्याचे समाजसेवक संजय कडोळे यांनी म्हटलेले असून, येत्या सार्वत्रिक निवडणूका पूर्वी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी केली आहे.