वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : समस्याग्रस्त पिडीत महिलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपिठ मिळावे व त्यांच्या तक्रारी/अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जर तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असेल त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. तालुकासतरावर तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी जर चौथ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे ऑगस्ट 2023 चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.