वाशिम.स्वामी विवेकानंद महाविद्यालय कोकलगावच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण शिबिर तोंडगाव येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष तथा अशासकीय सदश्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अमलबजावणी समिती वाशिमचे डाॅ. रामकृष्ण कालापाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, व्यसन मानसाचा विवेकच नष्ट करते व्यसनी मानसाला व्यसनापुढे सर्व काही गौण समजून बाकीच्या समजून मुला बाळाचे भावी आयुष्याची देखील चिंता नसते मुलाला शैक्षणिक साहित्य वेळेवर देणार नाही पण दररोज दारू पिऊन कुटुंबांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान देखील करतो हे थांबवावे म्हणून संत समाज सुधारकांनी आपले आयुष्य पणाला लावले व समाजाची अंधश्रद्धा दुर करून समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तथा अशासकीय सदश्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अमलबजावणी समिती वाशिमचे पी. एस. खंदारे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनार्थ विविध प्रकारचे चमत्कार सादरीकरण करून आपण अंधश्रद्धेला बळी कसे पडतो हे सप्रयोगाने सिध्द करून दाखवले व विद्यार्थ्यांच्या शंका समाधान केले.
पाण्याचा दिवा पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. अरविंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.व उपस्थितांसह विद्यार्थ्यांना व्यसनाचे शारिरीक आणि मानसिक व सामाजिक दुष्परिणामांचा वस्तुनिष्ठ परिपाठ सांगितला व व्यसनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा पी. एस. खंदारे वदवून घेतली असल्याचे त्यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय करंजमहात्म्य पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना भ्रमणध्वनी वरून कळवीले आहे . सदरहु कार्यक्रमात यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तोंडगावचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.
कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.आर. मोरे सर सोबत कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख एस.बी. गलांडे सर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. व्ही. गिरी सर, महिला कार्यक्रम अधिकारी कु. एस. आर. गोटे मॅडम व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.भगत सर संचलन कु. पूजा वाकुडकर हिने केले तर आभार प्रदर्शन प्रांजल सुरशे हिने केले. असल्याचे त्यांनी सांगीतले .