अमिर्झा : मरेगाव येथून काम आटोपून स्वगावी चांभार्डा येथे जात असतांना वळणावर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक बसून अपघात झाला यात दुचाकीचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
सदर घटना 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. दिलीप संभाजी किरंगे रा. चांभार्डा असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिलीप किरंगे हे मरेगाव येथून MH 33.Y 7256 क्रमांकाच्या दुचाकीने काम आटोपून स्वगावी चांभार्डा जात होते. दरम्यान मरेगाव नजीकच्या एका वळणावर दिलीप यांचे
दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला दुचाकीची जबर धडक बसून अपघात झाला. यात दिलीपला जबर मार बसल्याने जागीच ठार झाला.घटनेची माहिती तात्काळ आरमोरी पोलिसांना देण्यात आली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.