वृध्द दाम्पत्यास जबर मारहाण करून लुटणारी टोळी जेरबंद ; ०७ गुन्हे उघड ०२ आरोपींसह ०८. ७० लाखांचा मुद्देमाल जप्त. समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून नागरिकांच्या मालमत्तेची चोरी / नुकसान करणाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाते. नुकतेच पो. स्टे. वाशिम शहर, पो. स्टे. वाशिम ग्रामीण, पो.स्टे. मालेगाव हद्दीत विविध ठिकाणी जबरी चोरीसह घरफोड्या करणाऱ्या ०२ आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले आहे.
वाशिम शहरातील जुनी IUDP कॉलनी, वाशिम येथील एका कुटुंबातील पती-पत्नीस घरात घुसून जबर मारहाण करत जबरी चोरीची घटना घडली होती त्याचबरोबर पो. स्टे. वाशिम शहर हद्दीतील मानमोठे नगर, अवलिया बाबा नगर शेलू रोड, सिव्हील लाईन्स येथे, पो. स्टे. वाशिम ग्रामीण हद्दीतील ग्राम काकडदाती येथे व इंगोले ले-आउट, कोंडाळा रोडयेथे तसेच पो. स्टे. मालेगाव शहरातील गीता नगर येथे रात्री घरफोड्या झाल्या होत्या. सदर प्रकरणांचा तपास करत असतांना घटनास्थळी पुरेशे तांत्रिक पुरावे उपलब्ध नसतांना गोपनीय माहितीच्या आधारे आपले तपास कौशल्य पणास लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी चोरीसह घरफोड्या करणाऱ्या ०२ आरोपींना बुलढाणा येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ०८ ७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अटक आरोपींवर यापूर्वीदेखील वाशिम, बुलढाणासह विविध जिल्ह्यांमध्ये जबरी चोरी व घरफोडीचे १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून त्यानुषंगाने अटक आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाईकेली जाणार आहे. त्याचबरोबर आरोपींचे इतर साथीदार तसेच त्यांचा इतर गुन्ह्यामध्ये सहभाग याबाबतचा सखोल तपास सुरु आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह(IPS), अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी. सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, सपोनि. विजय जाधव, पोउपनि शब्बीर पठाण, पोहवा. सुनील पवार, पोना. राजेश राठोड, मपोना. रेश्मा ठाकरे, पो. शि. डीगांबर मोरे, निलेश इंगळे, अविनाश वाढे, शुभम चौधरी, विठ्ठल सुर्वे सर्व नेमणूक स्था. गु. शा. वाशिम यांनी पार पाडली.वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, त्यांना त्याच्या परिसरात काही संशयास्पद हालचाली किंवा व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क करून पोलिसांना सूचित करावे.