वाशिम जिल्ह्याला स्वतःच्या मतदार संघातील पालकमंत्री मिळाल्याखेरीज जिल्ह्याचा विकास नाही.
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : गेल्या विधान सभेच्या जवळ जवळ तिन निवडणूकांपासून जिल्ह्याला, स्वतःच्या मतदार संघातील, पालकमंत्री न मिळाल्याने,दि 1 जुलै 1998 रोजी नव्याने स्थापन झालेल्या जिल्ह्याचा विकास अध्यापही रखडलेलाच असून, जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मिळालेले बाहेरचे मंत्री, वाशिम जिल्हयाचे पालकत्व सांभाळण्या ऐवजी,स्वतःच्याच जन्मभूमी कर्मभूमी कडे जास्त लक्ष देतात. व हे मंत्री स्वातंत्र्यदिन - प्रजासत्ताक दिनाला झेंडा फडकविण्यापुरतेच मर्यादीत राहतात असे आजवरचे या जिल्हयाचे अनुभव आहेत. सध्या राज्यात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी या तिन पक्षाचा त्रीवेणी संगम असून, जिल्ह्यात राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचा एकही आमदार नाही. मात्र सत्ताधारी पक्षाचे,सध्या वाशिम जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष असलेले कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी आणि लखन मलीक हे दोन आमदार आहेत. आज मुंबईत मंत्रीमंडळ विस्ताराच्या बैठकी व चर्चा होत असून लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याने, जिल्ह्यातील विधानपरिषद व कारंजा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून विस वर्षाचा अनुभव असलेले, अभ्यासू व विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व राजेंद्र पाटणी यांचा मंत्रीमंडळात समावेश होऊन, त्यांचीच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात येवून,वाशिम जिल्ह्याला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.