कारंजा (लाड) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशीम शाखा कार्याध्यक्ष तथा अशासकीय सदस्य जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समिती वाशीम, राज्य सहसचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस एनडिएमजे महाराष्ट्र यांचे कारंजा येथे खाजगी कामा निमित्त पहिल्यांदा आगमन झाल्याची वार्ता ऐकून स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तथा श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनी पि.एस. खंदारे यांना सर्वप्रथम स्थानिक अशोकनगर येथील बुद्धविहारामध्ये आणले. यावेळी प्रमुख पाहुणे पि.एस.खंदारे यांचे हस्ते महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. त्यानंतर विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून समाजप्रबोधकार पि.एस.खंदारे यांचे कारंजा नगरीत स्वागत व सत्कार करण्यात आला. पि. एस. खंदारे साहेब यांना समाजातील अनिष्ट रुढी व चुकीच्या परंपरा विषयी चिड असून ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या राष्ट्रिय,सामाजिक व तिर्थक्षेत्रावरील वारीच्या कार्यक्रमात भ्रमंती करून, कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या वेशभूषेत व बोलीभाषेत, बाबांच्याच शैलीत किर्तन करून समाज प्रबोधन करून,समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे बहुमोल कार्य करीत असल्याची माहिती संजय कडोळे यांनी उपस्थितांना दिली. यावेळी
विजय पाटील खंडार, प्रदीप वानखेडे, गजाननराव चव्हाण,
श्रीकृष्ण पाटील नेमाने,दर्शन पाटील,आदी पदाधिकारी उपस्थित होते.