वाशिम :-श्री.किसनलाल नथमल गोयनका कला,वाणिज्य महा विद्यालय कारंजा(लाड)येथे राष्ट्रीय सेवा योजना व कारंजा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप येवले, प्रमुख वक्ते प्रदीप पाडवी उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा, दिनेशचंद्र शुक्ला पोलीस निरीक्षक कारंजा शहर तसेच अमोल पुरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर क्राईम ब्रँच वाशिम हे उपिस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर क्राईम ब्रँच वाशिमचे अमोल पुरी यांनी सायबर सुरक्षाबद्दल मार्गदर्शन करीत ऑनलाइन पद्धतीने पैशांची फसवणूक कशी होते, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थी आणि प्राध्यापकांसोबत संवाद साधला तसेच दिनेशचंद्र शुक्ला पोलीस निरीक्षक कारंजा शहर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थींनी, विद्यार्थी यांना होणारा त्रास, कौटुंबिक स्तरावर होणारी भांडणे याबाबत जागृकता निर्माण करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा प्रदीप पाडवी यांनी विद्यार्थ्यांना पोलीस खाते व त्यामधील विविध कलमांबद्दल माहिती दिली.
डॉ. प्रदीप येवले यांनी सायबर सुरक्षेबद्दल माहिती दिली. तसेच पोलिस खात्यांद्वारे आयोजित या सप्ताहाचे आयोजनाबद्दल पोलिस विभागाचे आभार मानले.
विद्यार्थ्यांची कोणत्याच प्रकारची फसवणूक होऊ नये, यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन प्रा. दिपाली तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अतुलकुमार महाले यांनी केले. या कार्यक्रमाला वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.बलजितकौर ओबेरॉय तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.असे वृत्त विजय खंडार यांनी कळविले