पुणे दि, क्रांतीसुर्य थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या पुणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दादाभाऊ नवरोजी फकिरा साठे वस्ताद लहुजी साळवे कर्मयोगी संत गाडगेबाबा संत रविदास महात्मा गांधी संत तुकाराम महाराज माता रमाई माता जिजाऊ सावित्रीबाई फुले मदर तेरेसा अहिल्याबाई होळकर यांच्यासह अनेक पुरोगामी महाराष्ट्रातील थोर संत आणि समाजसुधारक होऊन गेलेल्या या महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकांचे मोफत वाटप बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती दिनानिमित्त पुणे रेल्वे स्टेशन रोड वरील असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी पुष्पहार घालून नतमस्तक होऊन अभिवादन केले .
यावेळी बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी मोफत मिळत असलेल्या पुस्तकांसाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपस्थिती लावली कार्यक्रमाचे संचालन बहुजन जनता दल पुणे जिल्हा अध्यक्ष महेंद्र बरकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बहुजन जनता दलाचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रतिक दाभाडे यांनी केले यावेळी युवा आघाडी महिला आघाडी कामगार आघाडी फिल्मसिटी आघाडी विद्यार्थी आघाडी यांच्यासह बहुजन जनता दलाचे दीपक सुरवाडे जीवन गवई दीपक पाटील दादाराव वानखेडे शिरसाट मयूर दांडगे विशाल खंडारे आशिष बरकडे सुनील अहिरे बळीराम कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे कार्यक्रमाचे आयोजक आणि बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे