अकोला- वारकरी संप्रदायातील संतांनी महाराष्ट्रात सामाजिक जडणघडण केली. वारकरी ही सामाजिक सद्भभावनेची चळवळ आहे. म्हणून वारकरी संप्रादाया चा अभ्यास सामाजिक चळवळीच्या माध्यमातून केला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. श्रीकांत तिडके यांनी केले.
स्व. डॅडी देशमुख यांच्या २०व्या पुण्यतिथीनिमित्त बाबूजी देशमुख वाचनालय,लालीत कला अकादमी व श्री शिवाजी महाविद्यालयाचे वतीने आयोजित कार्यक्रमाते बोलत होते. बाबूजी देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ललित कला अकादमीचे अध्यक्ष प्रा. सुरेश राऊत, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, प्रा. नारायण कुलकर्णी कवठेकर, प्रशांत देशमुख ,बाबूजी देशमुख वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्रा यांची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.श्रीकांत तिडके यांनी आपल्या भाषणातून प्रारंभी डॅडी देशमुख यांचा विविध क्षेत्रातील असलेला वावर दरारा सर्वांना प्रेरणादायी होता. सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात डॅडीचे असणे म्हणजे कार्यक्रमाची फलश्रुती समजले जायचे. डॅडीनी गाडगेबाबांना बुवा होऊ दिले नाही ही खूप मोठी जमेची बाब आहे. त्यांनी विज्ञानवादी समाज संत गाडगेबाबांचे चरित्र 'देवकी नंदन गोपाला ' चित्रपटाच्या माध्यमातून समाजासमोर मांडले.गाडगेबाबांना त्यांनी बुवा होऊ दिले नाही ही खूप मोठी जमेची बाब आहे असे प्रतिपादन ''आजच्या संदर्भात संत साहित्य '' या विषयावर व्याख्यान प्रसंगी केले.
स्व. डॅडी देशमुख यांच्या विसाव्या पुण्यतिथी निमित्त ललित कला अकादमी व बाबूजी देशमुख वाचनालय यांच्या वतीने संपन्न झालेल्या शालेय रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर परीक्षेत अर्थशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त कु.अपेक्षा प्रमोद सांगोळे जी.एस. कॉलेज खामगाव व कु.स्नेहा सुभाष भोयर आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे या विद्यार्थिनींचा स्व. डॅडी देशमुख स्मृती प्रित्यर्थ सुवर्ण पदक, रोख रक्कम, 1000 रुपये व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. रंग भरन स्पर्धेचे परीक्षक चित्रकार सतीश पिंपळे, सुनील नागपुरे, मधुकर मानकर, प्रतिक वाघ, रंजन लोखंडे, मंगेश सिंगनाथ यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, प्रा. नारायण कुलकर्णी कवठेकर, महादेवराव भुईभार यांची या प्रसंगी समयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. मोहन खडसे यांनी केले. माजी नगराध्यक्ष नानुभाई पटेल, माजी आमदार वसंतराव खोटरे, अरुण बापू देशमुख, प्राचार्य कुलट, माजी प्राचार्य बंड,सतीश देशमुख, प्रा.सुमन तिरपुडे,डॉ.विवेक हिवरे,बबनराव कानकिरड,राम मुळे,विनोद अग्रवाल यांचेसह सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....