वाशिम : पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा सकाळी 11 : 00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह वाशिम येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती योजना व आदिवासी उपयोजना सन 2023-24 या वर्षात करण्यात येणाऱ्या कामांचा,आय-पास प्रणालीवर प्रस्तावित केलेली कामे व मान्यता मिळालेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.