वाशिम : यंदाच्या उन्हाळ्यातील प्रखरतेमुळे वातावरणात तप्त लहरी वहात असून,पशू पक्ष्यांसह मानवी जीवन जगणेही दुरापास्त होत असून, त्याचा थेट मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. उष्णतेचा सर्वात जास्त त्रास दुर्धर आजारग्रस्त,लहान बालकं,वयोवृद्ध, दिव्यांग आणि गरोदर महिलांना होत आहे. त्यातच हवामान विभागाच्या, उष्णतेच्या हायअलर्टमुळे जनतेमधून चिंता व्यक्त होत असून, पूर्व पश्चिम विदर्भात 45 अंश सेल्सियसच्या दरम्यान असणारे तापमान लवकरच
अकोला, चंद्रपूर,नागपूर,अमरावती,वाशिम येथे 48 अंशांपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याशिवाय बंगाल मधील उपसागरात वारंवार उद्भवणारी वादळाची स्थिती पहाता त्याचाही थेट परिणाम विदर्भासह उर्वरीत महाराष्ट्राच्या काही भागात होणार असल्याचे संकेत आहेत. परिणामी चालू आठवडयात अचानक वातावरणात बदल संभवून, काही ठिकाणी वेगाचे वादळी वारे वाहून विजांच्या कडकडाट आणि गारपिटीसह हलक्या ते मध्यम पावसाची नोंद होऊ शकते.असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले ,नैऋत्य मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात मे महिन्यात होत असल्याने,काही भागांत मान्सूनपूर्व पाऊसा अगोदर अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे शासनाच्या हवामान विभागाकडूनही हवामानाचा अंदाज व्यक्त करतांना सावधगीरी बाळगण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आता आहे. त्यामुळे आकाशात अवकाळी पाऊसाचे संकेत दिसताच, शेतात असणारे शेतकरी, शेतमजूर,गुराखी यांनी गावाकडे धाव घ्यावी. अवकाळीचे ढग दिसताच शेतात कुणीही थांबू नये. किंवा गुरेढोरे ठेवू नये. अवकाळी मध्ये जास्त प्रमाणात विजा पडण्याची व गारपिट होण्याची संभावना लक्षात घेता शेतकरी,मजूर,गुराखी,मेंढपाळ यांनी हिरव्या झाडाच्या आश्रयाला स्वतःही जाऊ नये व गुरेढोरे देखील बांधू नये.विजा कडाडत असतांना विद्युत उपकरणे व मोबाईल फोन बंद करून स्विच ऑफ ठेवावे. सावधानी ठेवावी असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.