भद्रावती :-
स्व.विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठानद्वारा भद्रावती येथे मागील सात वर्षापासून "स्मृतिगंध"काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते.या संमेलनामध्ये उद्घाटन समारंभ,निमंत्रितांचे कविसंमेलन,गझल मैफिल,खुले कविसंमेलन इत्यादी सत्रांचा समावेश आहे.
या संमेलनाचे शेवटचे सत्र असलेले खुले कविसंमेलन संमेलनाध्यक्षा गीता देव्हारे प्रमुख अतिथी दीपक शिव,सीमा भसारकर,गोपाल शिरपूरकर, रमेश भोयर,आरती रोडे,वसंत ताकधट यांच्या उपस्थितीत काव्यमय मैफील रंगले. कविसंमेलनात उपस्थित सर्वच कवींनी उत्तमोत्तम कविता सादर करून सभागृहातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी महेश कोलावार,विवेक पत्तीवार,शंकर लोडे,उज्वला नगराळे,अनिल पिट्टलवार,चंदू पाथोडे,नागसेन सहारे,नटराज गेडाम,प्रकाश पिंपळकर,जितेश कायरकर,विघ्नेश्वर देशमुख, हरिदास चंदनखेडे,प्रशांत उज्वलकर,शालीक दानव,अनुराग गोवर्धन,ज्ञानेश हटवार,अनंत मत्ते,अरुण देवगडे,उद्धव कुचनकर,संतोष रामटेके,प्रशांत ताजणे,मधुकर वाटेकर,दिलीप लभाने,शंकर क्षिरसागर,गणेश वाणी, सु.वि.साठे,शंकर वाणी, कुंता गणवीर, मुजूमदार, मंदाकिनी चरडे,केशनी हटवार, रामचंद्र बंड,अर्जून मेश्राम,आनंद भगत,निरन आत्राम,बाबाराव तेलरांधे,आराध्या वाणी आदी कवी - कवयित्रींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
कविसंमेलनाचे संचालन देवेंद्र निकुरे यांनी केले तर आभार प्रविण आडेकर यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....