कारंजा नगरी ही प्राचिन, ऐतिहासिक तिर्थक्षेत्र आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त सुवर्णनगरी म्हणून ओळखली जाते. ह्या नगरीत आणि नगरी सभोवतालच्या ग्रामिण भागातही, सर्वधर्म समभाव,सामाजिक सलोखा आणि शांतता टिकून रहावी.ह्याकरीता ह्या नगरीतील लाठीया परिवाराचे योगदान फार मोठे आहे.अशा लाठीया परिवारातील अरविंद मनसुखलाल लाठीया हे युवा असतांना त्यांनी कारंजा शहराचे सांस्कृतिक वैभव टिकविण्याकरीता आपल्या समवयस्क मित्रमंडळीच्या सहकार्या मधून कारंजा शहरात कारंजा जेसीज क्लबची स्थापना केली होती. या जेसीज क्लबतर्फे शहरात सांस्कृतिक कलेला चालना देण्याकरीता ते जेसीज सप्ताह साजरा करायचे.या सप्ताहामधून नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा व इतरही विविधांगी स्पर्धा व उपक्रम कित्येक वर्ष राबवून त्यांनी अनेक यशस्वी कलावंत घडवीले.कारंजा येथे जेसीज बालोद्यान,जेसीज तरणतलाव आदींची निर्मिती केली. त्यांच्या पुढाकाराने श्री गणेशोत्सव, नवदुर्गा उत्सव व सर्वधर्मियाचे सण उत्सव यशस्वीपणे साजरे होऊ लागले होते.भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रिय कॉग्रेस पक्षाद्वारे त्यांना समाज कार्य करण्याची संधी प्राप्त झाली. त्यामधून त्यांनी कारंजा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारून त्यांचे काळात पक्षसंघटन एकसंघपणे मजबूत केले. त्यामुळे त्यांच्या पुढाकारा मधून त्यांनी काँग्रेस पक्षाला अनेक लोकसभा विधानसभा निवडणूकाही जिंकून दिल्या.त्यामुळे ते स्थानिक कॉग्रेसचे भिष्माचार्य म्हणूनही ओळखले जातात.कारंजा नगर पालीका अध्यक्षपदाची देखील धुरा सांभाळून त्यांनी त्यांचे काळात शहरातील विकासकामे पूर्णत्वास नेली.आजही काँग्रेस पक्षावर त्यांची मजबूत पकड असून, त्यांना विश्वासात घेतल्या शिवाय पक्षाला निवडणूक जिंकता येऊ शकत नाही. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.स्वतः परंपरागात व्यवसायाने शेतकरी असणारे अरविंद लाठीया अत्यंत शिस्तप्रिय,समयसूचकता ठेवणारे असून शांत, संयमी, प्रेमळ, मनमिळाऊ,हसतमुख चेहऱ्याचे विश्वासू नेतृत्व म्हणून ओळखले जात असून हिंदू,मुस्लिम,गवळी,जैन,बौद्ध व सर्वच समाजामध्ये लोकप्रिय म्हणून ओळखले जातात.दि. १० एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने दिर्घायुष्य लाभो हिच परमेश्वर चरणी विनम्र प्रार्थना ! *लेखक : संजय कडोळे. अध्यक्ष विदर्भ लोककलावंत संघटना, कारंजा (लाड) जि. वाशिम. मो.न.9075635338.*