वाशिम :
श्रीक्षेत्र लाखनवाडी येथील जागृत असलेल्या, श्री गुणवंत महाराज संस्थान लाखनवाडी येथे लाखो भाविकांची नितांत श्रद्धा आहे . त्याच प्रमाणे कारंजा येथील अनासाने परिवाराची सुद्धा श्री गुणवंत बाबांच्या चरणी विशेष भक्ती आहे .
आणि म्हणूनच प्रतिवर्षी ते लाखनवाडी येथे जाऊन अन्नदानाचा कार्यक्रम साजरा करीत असतात . शनिवार दि २७ ऑक्टोंबर रोजी उमेश अनासाने यांनी लाखनवाडी येथे महापूजा देऊन अन्नदानाचा कार्यक्रम केला यावेळी त्यांनी भाविक मंडळीची जाण्यायेण्याची व्यवस्था केली होती.
कार्यक्रमाला सिरसो येथील गुणवंत महाराज, संजय महाराज कडोळे, रविन्द्र धरमठोक, अरविद धरमठोक, अनिल गोगटे, अक्षय गोगटे, दिलीप अनासाने, तेजस अनासाने, अमोल काळे, संजय पाटील चौधरी, तेजस बारबोले, चिंकूभाऊ तिवारी, प्रभाकर शहाणे , राजेश गोगटे, उमेश गोगटे व बऱ्याच संख्येने महिला मंडळीसह भाविकांची उपस्थिती होती असे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष उमेश अनासाने यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....