कारंजा : अखिल भारत वर्षातील दत्तउपासकांचे आराध्य दैवत असलेल्या दत्तावतार श्री
नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे श्रीदत्तप्रभूंचे अवतार. श्रीपाद श्री वल्लभ हे द्वितीयावतार.तर श्री नृसिंह सरस्वती स्वामी हे श्रीदत्तप्रभूंचे तिसरे अवतार आहेत. कारंजा शहरात त्यांची पावन जन्मभूमी असून येथे वसलेल्या श्री गुरु मंदिरामध्ये श्रींचा जन्मोत्सव शैलगमन यात्रा दिनापर्यंत मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.व त्यानिमीत्ताने देश विदेशातील महान विभूती,जगद्गुरू शंकराचार्य,संत महात्मे, कलावंत आणि श्री दत्तउपासकांच्या कारंजा जन्मस्थळाला आवर्जून भेटी होत असतात. यंदाचा ७२५ वा जन्मोत्सव दि. १ जानेवारी २०२५ पासून तर दि. १३ फेब्रु पर्यंत श्रीगुरुमंदिरात संपन्न झाला. या उत्सवात सुंदर व आकर्षक रांगोळी साज व सजावट विद्युत रोशनी फुलं हार सजावट व अशे अनेक प्रकारचे साज सजावट पाहवयास मिळाले. तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. व या भक्तिमय वातावरणात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने महाराजांचे दर्शन करून या उत्सवात आपला सहभाग नोंदविला व भक्तिमय वातावरणात अनेक भजनी मंडळानी महाराज चरणी भजन करून भक्ती गीत सेवा दिली .व यावेळी दि . १ जानेवारी २०२५ रोजी दत्त नामस्मरणाच्या गजरात दुपारी १२ : ०० वाजता महाराजांचा जन्मोत्सव ; तर दि ९ फेब्रुवारी रोजी रुद्र स्वाहाकार व शतचंडी स्वाहाकार यज्ञास दुपारी १२ : ०० वाजता पासून प्रारंभ करण्यात आला. गुरुवार दि १३ फेब्रु २०२५ रोजी १०:०० वाजता यज्ञ पूर्ण आहुती व महाराजांची आरती व दुपारी १२ : ०० पासून ०४ : ०० वाजेपर्यंत भव्य असा महाप्रसाद नंतर संध्याकाळी ७ : ०० वाजेपासून महाराजांची पालखी नगर परिक्रमेकरीता मंदिरामधून मार्गस्थ झाली. यावेळी श्रींच्या पालखी शोभा यात्रेमध्ये भालदार चोपदार विणेकरी यांचेसह विविध भजनी मंडळ, वारकरी मंडळाच्या दिंड्या सहभागी झाली होत्या . संपूर्ण शहरात संपूर्ण रात्रभर कारंजेकर गावकरी मंडळीकडून आनंदोत्सव साजरा होत होता . ठिकठिकाणी सडा रांगोळ्या काढून तोरणमाळा, दिपोत्सव साजरा करून श्रींच्या पालखीचे स्वागत होत होते. ठिकठिकाणी भाविकांनी अल्पोपहार, दूध, चहापान, फळ वाटपाचे कार्यक्रम आयोजीत केले होते. संपूर्ण रात्रभर टाळमृदंगाच्या गजरात परिभ्रमण करीत श्रींची पालखी दुसरे दिवशी सकाळी ०९:०० वाजेला परत गुरमंदिर येथे स्वगृही आली असता. पुष्पवर्षावात आणि दत्तनामस्मरणाच्या जयजयकारात श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. मंदिरात महाआरती व प्रसादाने कार्यक्रम सांगता करण्यात आली.असा हा ४५ दिवसाचा शैलगमण यात्रा महोत्सव संपन्न झाला यामध्ये उपस्थित श्रीगुरुमंदिर विश्वस्त मंडळ,अध्यक्ष व सर्व आजी माजी पदाधिकारी व सर्व सेवाधारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित दिंड्या, वारकरी भजनी मंडळी आणि भाविक भक्तांचे विश्वस्त मंडळींनी स्वागत व सत्कार केले.