येत्या 22 सप्टेंबर 2025 पासून शहरात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार असून, परिसरातील विविध मंडळांनी उत्सव साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर, पोहा वेश परिसरातील आझाद हिंद नवदुर्गा उत्सव मंडळाची आढावा बैठक बुधवार, 10 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता पलक बेस्ट मावा कुल्फीच्या वरील हॉलमध्ये यशस्वीपणे पार पडली.
बैठकीच्या सुरुवातीला माँ दुर्गा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नवरात्र उत्सवाच्या तयारीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सविस्तर चर्चा केली. मंडप सजावट, समाजपयोगी उपक्रम राबवणे आणि उत्सवाच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन यासंदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात आले. बैठकीला युवा वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती, ज्यामुळे उत्सवाच्या तयारीला आणखी बळ मिळाले.
आझाद हिंद नवदुर्गा उत्सव मंडळ यंदा नवरात्र उत्सव भक्तिमय आणि सामाजिक दृष्टिकोनातून वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी कटिबद्ध आहे.