स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने स्वातंत्र्यदिनी रयत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. तुळशीरामजी तलमले यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी ७.३० वा. पार पडला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्थेच्या उपाध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, त्याग, शांती, आणि समृद्धीचे प्रतीक असलेला आपला तिरंग्याचे स्मरण करून विद्यार्थ्यांना मोलाचं संदेश दिला. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या मनोगतात तिरंगा जो फडफडतो त्यावेळी आपल्या शरीरातील रक्त सळसळतो तेव्हा आपल्याला त्याग आणि बलिदानाचं स्मरण होऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्याच्या आठवणी जाग्या होतात.
या प्रसंगी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला श्री निलेश बंडूची उरकुडे, प्रा.कुर्जेकर सर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.