वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):
व्हाईस ऑफ मिडीया संघटनेच्या वाशीम जिल्हयातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना सुचित करण्यात येते की,पत्रकारांना अधिस्विकृती,शासकीय जाहिरात, अधिकृत पत्रकार नोंदणी कार्ड,स्वतंत्र महामंडळ, पत्रकार पुरस्कार,सेवानिवृत्तीचे मानधनाचा शासन निर्णय, श्रमिक पत्रकारांचा शासन निर्णय, अधिस्विकृतीच्या जाचक अटी रद्द करणे,सोशल मिडीया पत्रकारीतेसाठी पॉलीसी,सोशल मिडीयासाठी जाहिराती, पत्रकारांना शासकीय विमा कवच आदी विविध मागण्यांसाठी सोमवार,दि. 28 ऑगष्ट 2023 रोजी राज्यभर आंदोलन व निवेदन देण्यात येत आहे.
या अनुषंगाने व्हाईस ऑफ मिडीया वाशीम जिल्ह्याच्या वतीने सर्व विंगच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या माध्यमातून मागण्यांचे निवेदन देण्यात येत आहे. तरी जिल्हयातील संघटनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी,सहकारी पदाधिकारी,सदस्य आदींनी 28 ऑगष्ट 2023 रोजी सकाळी ठिक 11:00 वाजता वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,वाशीम येथे उपस्थित राहावे ही विनंती.
पत्रकारांनो,ही एकट्याची लढाई नसून आपल्या सर्वाच्या हितासाठी संघटनेचे अध्यक्ष संदीप काळे यांनी सुरु केलेली लढाई आहे.गेल्या दोन वर्षापासून संघटनेच्या अविरत आंदोलनातून काही मागण्या आपण मंजुर करुन घेतल्या असून अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत.
आपण सर्व पत्रकार इतरांसाठी जगतो,इतरांसाठी लढतो.मात्र आज आपल्याला स्वत:साठी, स्वत:च्या अस्तित्वासाठी लढावे लागेल. तरच आपले अस्तित्व कायम राहील.
तरी पत्रकार बांधवांनो,सोमवार, 28 ऑगष्ट रोजी सकाळी ठिक 11:00 वाजता आपण सर्व एकजूट होवून एकत्र येवू या आणि शासनाला आपली ताकद दाखवू या ! असे जिल्ह्यातील पत्रकारांकरीता ,जिल्हाध्यक्ष भागवत मापारी आणि साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संदीप पिंपळकर वाशीम जिल्हा यांनी आवाहन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....