कारंजा (लाड) : सौ.शोभनाताई चवरे विद्यालय कारंजाचे बालविर विद्यार्थी लखन कंठाळे व हरिष चाकोलकर ठरले "सास शौर्य पुरस्काराचे" मानकरी. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,सौ.
शोभनाताई नरेंद्रकुमार चवरे विद्यालय काळी कारंजा (लाड) येथे शाळकरी मुलांनी,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 अंतर्गत व सर्वधर्म मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८/०८/२०२४ रोजी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतले. संस्थेचे अध्यक्ष शशिकांतजी चवरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख मार्गदर्शक सर्वधर्म मित्र मंडळ कारंजा (लाड) अध्यक्ष श्याम सवाई ,प्रमुख अतिथी म्हणून सास शोध व बचाव पथक समुपदेशक राजु कांबळे,सूर्या गॅस सेप्टी डिवाइस चे तालुका समन्वयक आकाश पडघन यांचे प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना कोणत्याही संकटाची चाहूल कळावी व त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. ज्योती काळे, सोनाल भगत,सौ. शोभनाताई न. चवरे विद्यालयाचे राजेश लहाने,पंकज सोनोने,व शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग यावेळी उपस्थित होता.सर्वधर्म मित्र मंडळ गेल्या 25 वर्षा पासुन आरोग्य क्षेत्रात तसेच आपत्ती व्यवस्थान क्षेत्रात कार्य करत असून आता पर्यंतच्या अनुभवातून एखादी आपत्ती निर्माण झाली जसे शाळेच्या वर्गात एखादा साप निघाला असेल तर त्यावेळेस भीतीने पळून न जाता त्यावेळेस त्या नैसर्गिक आपत्तीचा सामना कसा करता येईल ? हे प्रात्यक्षिका द्वारे सांगितले.तसेच जखमी झालेल्या व्यक्तीला प्रथमोपचारामुळे रुग्णांचा जीव सुरक्षित होऊ शकतो.असे मत प्रमुख मार्गदर्शक श्याम सवाई यांनी यावेळी मार्गदर्शनातून व्यक्त केले. याबरोबरच सवाई यांनी विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन जखम झाल्यास काय करावे ? अपघात झाल्या नंतर काय करावे ? चक्कर येऊन पडल्यास काय करावे ? तसेच उपलब्ध साधनांचा उपयोग करून प्रथमोपचार करणे. चादरी पासून ट्रेचर बनविणे इत्यादी प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याच प्रमाणे आपल्या घरात किवा शाळेत आग लागली असेल त्यावेळेस आपण काय उपाय करू शकतो ! हे यावेळी प्रामुख्याने मुलांना सांगण्यात आले.तसेच वेगवेगळ्या उदहरणांमधून प्रथमोपचाराची गरज पटवून दिली. सर्वधर्म मित्र मंडळ कारंजा कडून चालविण्यात येणाऱ्या "वन सेकंद वन कॉल न्यू लाईफ अभियान" याद्वारे चालविण्यात येणाऱ्या अपघात ग्रस्तांना मदतीचा हात देणारी संकल्पना विद्यार्थ्यांना सदर कार्यक्रमातून श्याम सवाई यांनी पटवून दिली. यावेळी लखन कंटाळे व हरिष चाकोलकर या विद्यार्थ्यांची श्याम सवाई यांनी सास शौर्य पुरस्कारकरीता निवड करीत त्यांचे अभिनंदन केले.